Haryana CM Oath Ceremony : ठरलं तर… हरियाणामध्ये ‘या’ दिवशी होणार मुख्यमंत्री पदाची शपथ 

278
Haryana CM Oath Ceremony : ठरलं तर... हरियाणामध्ये ‘या’ दिवशी होणार मुख्यमंत्री पदाची शपथ  
Haryana CM Oath Ceremony : ठरलं तर... हरियाणामध्ये ‘या’ दिवशी होणार मुख्यमंत्री पदाची शपथ  

नायब सिंग सैनी (Naib Singh Saini) 17 ऑक्टोबर रोजी हरियाणाचे पुढील मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींसह (PM Narendra Modi) भाजपाचे सर्व वरिष्ठ पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. सैनी यांचा शपथविधी दसरा ग्राउंड सेक्टर 5 पंचकुला येथे होणार आहे. यासाठी सकाळी 10 वाजताची वेळ निश्चित करण्यात आली आहे. (Haryana CM Oath Ceremony)

केंद्रीय मंत्री आणि हरियाणाचे माजी मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर (Manohar Lal Khattar) म्हणाले की, “आम्हाला पंतप्रधानांची मंजुरी मिळाली आहे तसेच मुख्यमंत्री आणि मंत्रीमंडळ 17 ऑक्टोबर रोजी पंचकुलामध्ये शपथ घेणार आहे.” असे नायबसिंग सैनी यांनी सांगितले. हरियाणाचे नवे मुख्यमंत्री नायब सिंग सैनी (Naib Singh Sani) यांच्या शपथविधी सोहळ्याच्या तयारीत जिल्हास्तरीय समिती व्यस्त आहे. अलीकडेच सैनी यांनी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आणि भाजपाच्या इतर वरिष्ठ नेत्यांची भेट घेतली होती. याशिवाय त्यांनी केंद्रीय मंत्री आणि हरियाणाचे निवडणूक प्रभारी धर्मेंद्र प्रधान यांचीही भेट घेतली. 

तिसऱ्यांदा भाजपाचे सरकार स्थापन होणार आहे

हरियाणा विधानसभा निवडणुकीत भाजपाची सामाजिक समीकरणाची रणनीती कामी आली आणि 48 जागांसह मोठा विजय नोंदवला गेला आहे. राज्यात सलग तिसऱ्यांदा भाजपा सरकार स्थापन होणार आहे. काँग्रेसच्या पराभवाबरोबरच जननायक जनता पक्ष (जेजेपी) आणि आम आदमी पक्ष (आप) ही पक्ष कमकुवत झाले आहेत.

(हेही वाचा – Nikhat Zareen : निखत झरिनची वैयक्तिक प्रशिक्षकाची मागणी)

शपथविधी सोहळ्याला सुमारे ५० हजार लोक उपस्थित राहण्याची शक्यता आहे. भाजपशासित राज्यांचे अनेक मुख्यमंत्रीही या सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. याशिवाय केंद्रीय मंत्री आणि भाजपाच्या मोठ्या नेतृत्वासह पक्षाचे वरिष्ठ नेतेही या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, अनिल विज, कृष्ण लाल मिधा, श्रुती चौधरी, अरविंद कुमार शर्मा, विपुल गोयल, निखिल मदान यांना हरियाणा सरकारच्या नवीन मंत्रिमंडळात स्थान मिळू शकते.

हेही पाहा –

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.