विशेष प्रतिनिधी,मुंबई
मुंबई महानगरपालिका अंतर्गत प्रशासकीय विभाग पुनर्रचनेनंतर नव्याने निर्माण झालेल्या ‘के उत्तर’ या नव्या प्रशासकीय विभागाचे लोकार्पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते शुक्रवारी ११ ऑक्टोबर २०२४ रोजी सायंकाळी करण्यात आले. त्यावेळी मुख्यमंत्री शिंदे (CM Eknath Shinde) हे बोलत होते. त्यामुळे महापालिकेच्या २४ प्रशासकीय कार्यालयांच्या तुलनेत आता पी पूर्व नंतर आता के उत्तर विभागाचे लोकार्पण झाल्यानंतर प्रशासकीय कार्यालयांची संख्या २६वर पोहोचली आहे.
के – उत्तर इमारतीच्या कोनशिलेचे अनावरण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या हस्ते यावेळी करण्यात आले. जोगेश्वरी (पूर्व) मध्ये पूनम नगर परिसरातील हिंदुह्दयसम्राट बाळासाहेब ठाकरे मजास मंडई स्थित या प्रशासकीय कार्यालय लोकार्पण सोहळ्यास खासदार रवींद्र वायकर, (Ravindra Waikar) सहायक आयुक्त (के पूर्व) मनीष वळंजू यांच्यासह विविध मान्यवरांची उपस्थिती होती.
(हेही वाचा – Nikhat Zareen : निखत झरिनची वैयक्तिक प्रशिक्षकाची मागणी)
प्रशासकीय विभाग पुनर्रचनेतून नव्याने निर्मित के-उत्तर प्रशासकीय विभागाद्वारे संपूर्ण क्षमतेने आणि सर्व प्रकारच्या नागरी सेवा सुविधा पुरविण्यात येणार आहेत. विभाग कार्यालयाच्या माध्यमातून नागरिकांना देण्यात येणार्या सुविधेमध्ये यामुळे भर पडणार आहे. नागरिकांना आपल्या नजीकच्या परिसरात सेवा सुविधा प्राप्त करणे यामुळे शक्य होईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी केले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) पुढे म्हणाले की, नव्या विभागासाठी सुरूवातीपासूनच आवश्यक परवानगी, मंजुरी याबाबत महाराष्ट्र शासनाने सर्व सहकार्य केले. सर्व प्रक्रिया पार पडून आज या नवीन विभागाच्या लोकार्पणाची संधी मिळणे, हे मुख्यमंत्री म्हणून माझ्यासाठी भाग्याचे आहे. कारण या नव्या विभागामुळे परिसरातील जनतेची मोठी सोय होणार आहे. नागरिकांना आपल्या घराजवळ असलेल्या कार्यालयात पोहोचून नागरी सेवा सुविधा प्राप्त करता येतील, असे मुख्यमंत्री यांनी नमूद केले.
(हेही वाचा – Mohammed Shami : न्यूझीलंड विरुद्ध मोहम्मद शमीची निवड का झाली नाही?)
मुख्यमंत्री शिंदे (CM Eknath Shinde) पुढे म्हणाले की, मुंबईतील रस्त्यांच्या कॉंक्रिटीकरणाचा प्रकल्प संपूर्ण महानगर क्षेत्रात राबविण्यात येत आहे. त्यामुळे खड्डेमुक्त रस्ते मुंबईतील नागरिकांना अनुभवायला मिळत आहेत. तसेच मुंबई सुशोभीकरण प्रकल्पातून नागरिकांना तसेच पर्यटकांना सर्वोत्तम अनुभव मिळाला आहे. मुंबई महानगर स्वच्छ असावे यासाठी सखोल स्वच्छता मोहीमही राबविण्यात येत आहे. एकूणच मुंबई महानगर स्वच्छ आणि सुंदर असावे यासाठी, महाराष्ट्र शासन आणि महानगरपालिका यांच्या माध्यमातून सर्वतोपरी प्रयत्न केले आहेत, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी सांगितले.
खासदार रवींद्र वायकर (Ravindra Waikar) मनोगत व्यक्त करताना म्हणाले की, गत अनेक वर्षांपासून नागरिकांची आपल्या नजीकच्या परिसरात विभाग कार्यालयाची सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी होती. नव्या के -उत्तर विभाग कार्यालयातून (BMC K North Ward Office) देण्यात येणार्या सुविधेमुळे नागरिकांचे श्रम आणि वेळ यात बचत होणार आहे. नागरी सेवा सुविधा पुरवण्याचा वेग देखील वाढणार आहे. प्रशासकीय विभाग कार्यालयाच्या माध्यमातून पुरवण्यात येणाऱ्या १७ प्रकारच्या नागरी सेवा-सुविधा या कार्यालयाच्या माध्यमातून पुरविण्यात येणार आहेत, असे खासदार वायकर यांनी नमूद केले.
(हेही वाचा – “हिंदूंनी संघटित आणि मजबूत…”, बांग्लादेशातील हिंसाचारावर सरसंघचालक Mohan Bhagwat नेमकं काय म्हणाले?)
के उत्तर प्रशासकीय विभागाच्या समावेशामुळे महानगरपालिका क्षेत्रातील विभागांची संख्या २६ पर्यंत पोहचली आहे. जोगेश्वरी स्थित पूनम नगर येथील हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महानगरपालिका मजास मंडई इमारतीतून सर्व प्रकारच्या नागरी सेवा सुविधा नागरिकांना उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
आठ प्रभागांचा समावेश
के उत्तर अंतर्गत एकूण आठ प्रभागांचा समावेश आहे. एकूण ८.५० चौरस किलोमीटर क्षेत्रफळाच्या क्षेत्रात हा विभाग विस्तारलेला आहे. अंदाजे चार लाखांहून अधिक लोकसंख्येचा समावेश या विभागामध्ये आहे. शाम नगर तलाव, मेघवाडी, सर्वोदय नगर, शेर ए पंजाब वसाहत, जलाशय, जोगेश्वरी गुंफा, महाकाली गुंफा, जोगेश्वरी रेल्वे स्थानक पूर्व परिसराचा समावेश या प्रशासकीय विभागामध्ये आहे. या दहा मजली इमारतीमध्ये तळ मजल्यावर नागरी सुविधा केंद्र उपलब्ध असेल. तसेच तिसरा, चौथा आणि पाचवा मजला याठिकाणी के उत्तर विभागाचे कार्यालय असणार आहे.
के उत्तर विभाग
क्षेत्रफळ – ८.५० चौरस किलोमीटर
लोकसंख्या – ४.२५ लाख
प्रभाग संख्या – ८
विभागातील महत्वाची ठिकाणे
जोगेश्वरी गुंफा
महाकाली गुंफा
लोकमान्य टिळक शामनगर तलाव
मातोश्री मीनाताई ठाकरे शिल्पग्राम उद्यान
हेही पहा –
Join Our WhatsApp Community