Rishabh Pant : रिषभ पंत खरंच दिल्ली कॅपिटल्सला राम राम ठोकणार?

रिषभ पंतच्या एका सोशल मीडिया पोस्टमुळे सध्या गोंधळ उडाला आहे.

159
IPL Mega Auction : रिषभ पंतसाठी या तीन संघांनी लावली ‘फिल्डिंग’
  • ऋजुता लुकतुके

भीषण रस्ते अपघातानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन करणाऱ्या रिषभ पंतने (Rishabh Pant) एका सोशल मीडिया पोस्टने खळबळ उडवून दिली आहे. आयपीएलच्या पुढील हंगामापूर्वी खेळाडूंचा लिलाव नोव्हेंबर महिन्यात होणार आहे. आणि त्यापूर्वी पंतने एक विचित्र पोस्ट केली आहे. त्यामुळे चाहते गोंधळात पडले आहेत. ‘मी लिलाव प्रक्रियेतून गेलो तर मला कुणी खरेदी करेल की नाही, आणि कितीला खरेदी करेल?’ असं रिषभने म्हटलं आहे.

याचा नेमका अर्थ काय लावायचा असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. चाहत्यांनी मात्र या पोस्टवर खुलेपणाने उत्तरं दिली आहेत. यातील अनेकांनी, ‘तुला भरघोस रक्कम मिळेल,’ असं म्हटलं आहे. तर दिल्ली कॅपिटल्स फ्रँचाईजीचे चाहते मात्र बुचकाळ्यात पडले. ‘तुम्ही दिल्ली सोडणार का,’ असा त्यांचा स्वाभाविक प्रश्न होता. २०२२ मध्ये झालेल्या रस्ते अपघातानंतर रिषभ पंतने (Rishabh Pant) एका सोशल मीडिया पोस्टने खळबळ उडवून दिली आहे. आयपीएलच्या पुढील हंगामापूर्वी खेळाडूंचा लिलाव नोव्हेंबर यंदाच्या आयपीएलमध्ये (IPL) भारतीय संघात पुनरागमन केलं. आणि त्यानंतर टी-२० विश्वचषक (T20 World Cup) विजेत्या संघातही तो होता.

(हेही वाचा – Navratri Utsav 2024 : महापालिकेच्या जी -दक्षिण विभागाने साजरा केला अनोखा नवरात्रौत्सव)

बीसीसीआय (BCCI) प्रशासनाने १० ही फ्रँचाईजींना आपल्याकडे असलेले ६ खेळाडू राखून ठेवण्याची मुभा दिली आहे. बाकीचे खेळाडू लिलावाच्या प्रक्रियेतून जातील, संघ मालकांनी अजून कुठले खेळाडू कायम राखणार याची यादी आयपीएलला दिलेली नाही.

(हेही वाचा – Raj Thackeray Podcast : स्वप्नातील महाराष्ट्र घडवण्यासाठी मला एक संधी द्या, राज ठाकरेंचं आवाहन)

रिषभ पंत (Rishabh Pant) आता न्यूझीलंडबरोबरच्या भारतातील मालिकेनंतर ऑस्ट्रेलिया दौऱ्याची तयारी करत आहे. ऑस्ट्रेलियाचा अव्वल फलंदाज लबुशेनने अलीकडेच रिषभ पंत (Rishabh Pant) हा भारतीय मधल्या फळीतील सगळ्यात लक्षवेधी आणि धोकादायक फलंदाज असल्याचं म्हटलं होतं. रिषभ पंतचा (Rishabh Pant) हा तिसरा ऑस्ट्रेलिया दौरा असेल. आणि याआधी बोर्डर – गावसकर चषकात त्याने लक्षवेधी कामगिरी केली आहे. खासकरून या आधीच्या मालिकते त्याने चमकदार कामगिरी केली होती. चषक भारताकडे राखण्यात त्याची भूमिका मोलाची होती.

ब्रिस्बेन कसोटीत भारताने ३ गडी राखून विजय मिळवला तेव्हा रिषभने नाबाद ८९ धावा करत एक बाजू लावून धरली होती. एकंदरीत रिषभने ऑस्ट्रेलियात ७ कसोटी सामन्यांत ६२ च्या सरासरीने ६२४ धावा केल्या आहेत. यात त्याच्या नावावर एक शतक आणि २ अर्धशतकं आहेत.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.