मुंबई पोलीस (Mumbai Police) दलातील १५ पोलीस उपायुक्तांच्या जिल्ह्याबाहेर बदल्या करण्यात आलेल्या आहे, त्यांच्या जागी जिल्ह्याबाहेरून आलेल्या उपायुक्तांच्या नियुक्त्या करण्यात आलेल्या आहे. मुंबई गुन्हे शाखा (अंमलबजावणी) येथे नवीमुंबईतून बदली होऊन आलेले विवेक पानसरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या बदल्यांचे आदेश मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी शुक्रवारी काढली आहे.
(हेही वाचा – …तर शस्त्रे आणि उपकरणांचा पूर्ण शक्तीनं वापर केला जाईल – संरक्षणमंत्री Rajnath Singh)
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर
राज्यातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यापासून इतर सर्व पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्याचे सत्र सुरु झाले आहे. गेल्या काही दिवसांत काही आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या होत्या. शुक्रवारी पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी मुंबई शहरात कार्यरत असलेल्या पंधरा पोलीस उपायुक्तांच्या बदल्याचे आदेश जारी केले आहे. या सर्व अधिकाऱ्यांना त्यांच्या नव्याने नियुक्त झालेल्या ठिकाणी रुजू होण्याचे आदेश देण्यात आले आहे. त्यात मुख्यालय दोनचे पोलीस उपायुक्त नवनाथ ढवळे यासंची परिमंडळ सहा, कालिना सशस्त्र विभागाचे पोलीस उपायुक्त नितीन पवार यांची पोलीस मुख्यालय दोन, अंमलबजावणी विभागाच्या पोलीस उपायुक्त रागसुधा आर यांची परिमंडळ चार, परिमंडळ दहाचे पोलीस उपायुक्त मंगेश शिंदे यांची आर्थिक गुन्हे शाखेच्या विशेष कृती दल, परिमंडळ सातचे पोलीस उपायुक्त पुरुषोत्तम कराड यांची विशेष शाखा एक, पोलीस मुख्यालय एकचे पोलीस उपायुक्त महेश चिमटे यांची संरक्षण विभाग, परिमंडळ तीनचे पोलीस उपायुक्त कृष्णकांत उपाध्याय यांची पोलीस मुख्यालय एक, विशेष शाखा एकचे पोलीस उपायुक्त दत्तात्रय कांबळे यांची परिमंडळ तीन, परिमंडळ सहाचे पोलीस उपायुक्त विवेक पानसरे यांची गुन्हे शाखा अंमलबजावणी, पूर्व उपपगरे वाहतूक विभागचे पोलीस उपायुक्त प्रदीप चव्हाण याची पूर्व उपनगरे वाहतूक विभाग, संरक्षण विभागाचे पोलीस उपायुक्त विजयकांत मंगेश सागर यांची परिमंडळ सात, सुरक्षा विभागाच्या पोलीस उपायुक्त डॉ. दिपाली धाटे यांची सुरक्षा विभाग, नागपूरचे पोलीस उपायुक्त निमित्त गोयल यांची कालिना येथील सशस्त्र पोलीस विभाग, ठाण्याचे पोलीस उपायुक्त सुधाकर बी पाठारे आणि सचिन गुंजाळ यांची अनुक्रमे बंदर परिमंडळ विभाग व परिमंडळ दहाच्या पोलीस उपायुक्त म्हणून बदली करण्यात आली आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community