Bus Accident : प्रभादेवी येथे बेस्ट बसच्या अपघातात पादचाऱ्याचा मृत्यू 

234
Bus Accident : प्रभादेवी येथे बेस्ट बसच्या अपघातात पादचाऱ्याचा मृत्यू 
Bus Accident : प्रभादेवी येथे बेस्ट बसच्या अपघातात पादचाऱ्याचा मृत्यू 
शहरातील प्रभादेवी येथे भरधाव वेगात असलेल्या बेस्ट बसने रस्त्यावर उभ्या असलेल्या कारला धडक दिल्याने ही कार फुटपाथवर चढून झालेल्या अपघातात ४७ वर्षीय पादचाऱ्याचा मृत्यू झाला आहे. शुक्रवारी दुपारी झालेल्या या अपघाताप्रकरणी ना.म.जोशी मार्ग पोलिसांनी बेस्ट बस चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे. (Bus Accident)
ज्ञानेश्वर नामदेव दिघे (४७) असे अपघातात ठार झालेल्या पादचाऱ्याचे नाव आहे. ज्ञानेश्वर दिघे प्रभादेवी कामगार नगर येथे राहण्यास होते. दिघे यांचा खरवस बनवून विकण्याचा व्यवसाय होता, शुक्रवारी दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास दिघे हे खरवसचा माल घेण्यासाठी निघाले होते. दरम्यान प्रभादेवी ना.म.जोशी मार्ग विनायक सदन इमारत या ठिकाणी उभ्या असलेल्या कारला भरधाव वेगात येणाऱ्या बेस्ट बसने पाठीमागून धडक दिली, ही धडक एवढी भीषण होती, कार फुटपाथवर चढून फुटपाथ वरून चालत निघालेले ज्ञानेश्वर दिघे यांच्यावर धडकली. या भीषण अपघात दिघे हे गंभीर जखमी झाले. त्यांना तात्काळ परळच्या केईएम रुग्णालयात उपचारासाठी आणले असता डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले. (Bus Accident)
या अपघातात बसमधील प्रवाशी सुदैवाने बचावले असून घटनेची माहिती मिळताच ना.म.जोशी मार्ग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन बेस्ट बस चालक अमीन शेख याला बस सह ताब्यात घेऊन त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला नोटीस देऊन सोडून देण्यात आले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अपघातात कारचे मोठे नुकसान झाले असून ही कार लोढा संकुल येथे राहणारे जैन नावाच्या व्यक्तीची असून त्यांनी रस्त्यावर मोटार पार्क करून दूध घेण्यासाठी गेले होते, त्याच वेळी हा अपघात झाला अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. (Bus Accident)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.