Uddhav Thackeray यांनी महाविकास आघाडीत पुन्हा ठिणगी टाकली; मुख्यमंत्री पदाची सुप्त इच्छा व्हिडिओरूपात दाखवली

257
Uddhav Thackeray यांनी महाविकास आघाडीत पुन्हा ठिणगी टाकली; मुख्यमंत्री पदाची सुप्त इच्छा व्हिडिओरूपात दाखवली
Uddhav Thackeray यांनी महाविकास आघाडीत पुन्हा ठिणगी टाकली; मुख्यमंत्री पदाची सुप्त इच्छा व्हिडिओरूपात दाखवली

शिवसेना उबाठा प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी महाविकास आघाडीत पुन्हा एकदा काडी टाकली. ठाकरे यांनी स्वतःची सुप्त इच्छा दसरा मेळाव्याच्या निमित्ताने उबाठा समर्थकांच्या मनात भरवण्यासाठी २०१९ मध्ये मुख्यमंत्री पदाच्या घेतलेल्या शपथेचा व्हिडिओ दसरा मेळाव्यात दाखवला आणि महाविकास आघाडीतील काँग्रेस आणि राष्ट्रवादी (शप) काँग्रेसच्या जागा उबाठापेक्षा जास्त निवडून येता कामा नये, असा अप्रत्यक्ष संदेश आपल्या समर्थकांना दिला.

स्क्रीनवर प्रथमच मांसाहेब मीनाताई ठाकरे

शनिवारी १२ ऑक्टोबर २०२४ रोजी सायंकाळी छत्रपती शिवाजी पार्क मैदानावर शिवसेना उबाठाचा दसरा मेळावा आयोजित करण्यात आला होता. मेळाव्यावर पावसाचे सावट असल्याने गर्दी तुलनेने कमी होती. यावेळी उबाठाच्या मेळाव्यातील व्यासपीठावर मागच्या बाजूला स्क्रीनवर प्रथमच शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत मांसाहेब मीनाताई ठाकरे यांचाही फोटो ठळकपणे लावला होता.

(हेही वाचा – Jyoti Waghmare यांनी केले उध्दव ठाकरेंचे नामकरण, म्हणाल्या, उध्दव…!)

राऊत-अंधारेंकडून ठाकरेंचे ब्रॅडिंग भावी मुख्यमंत्री

हरियाणा विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा पराभव झाला आणि भाजपाचे सरकार स्थापन होणार हे स्पष्ट झाले. त्याच दिवसापासून उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी कॉँग्रेसवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न करण्यास सुरूवात केली आणि मागे पडलेली मुख्यमंत्री पदाच्या उमेदवाराची मागणी पुढे केली. त्यानंतर उबाठा प्रवक्ते संजय राऊत आणि उपनेत्या सुषमा अंधारे यांनी ठाकरेंचे ब्रॅडिंग भावी मुख्यमंत्री म्हणून करण्यास सुरूवात केली. कॉँग्रेसने आणि राष्ट्रवादी (शप) यांनी मात्र ठाकरे यांच्या मागणीला कोणताही प्रतिसाद दिला नाही. हरियाणा निवडणुकीपूर्वी कॉँग्रेसने ‘ज्याच्या जागा जास्त त्याचा मुख्यमंत्री’ हा फॉर्म्युला असल्याचे स्पष्ट केले तर शरद पवार यांनी आपला पक्ष मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत नाही असे सांगितले होते.

पुन्हा तेच रडगाणे

शनिवारी मेळाव्याला मार्गदर्शन करताना उद्धव ठाकरे यांनी उपस्थितांना त्यांनी २८ नोव्हेंबर २०१९ ला मुख्यमंत्री पदाची शपथ याच शिवाजी पार्क मैदानात घेतल्याची नुसती आठवण करून दिली नाही तर त्यावेळेची शपथ घेतानाची व्हिडिओ क्लिप मेळाव्यात दाखवली आणि उद्धवसाहेब घेतलेल्या शपथेला जागले असा संदेश दाखवला. “ही मी शपथ घेतली होती तुमच्या साक्षीने आणि जशी शपथ घेतली तसा वागलो की नाही वागलो?” असा प्रश्न उपस्थितांना करत पुन्हा “पक्ष चोरला, चिन्ह चोरले, वडील चोरले,” हे रडगाणे गायले.

(हेही वाचा – काँग्रेसला धक्का…आमदार Sulbha Khodke पक्ष सोडणार; सहा वर्षांसाठी काँग्रेस पक्षातून केले निलंबित)

मित्रांच्या जागा कमी करण्याची तजवीज

त्याच्याही पुढे जात ठाकरे यांनी उपस्थितांना एक शपथ घ्यायला लावली. “मी शपथ घेतो की छत्रपती शिवराय, हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी माणसांची भक्कम एकजूट उभी केली ती अभेद्य ठेवेन. महाराष्ट्रात अंधकार घडवणाऱ्या दिल्लीतील शहांना रोखण्यासाठी मी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना अभिप्रेत असलेली शिवशाही महाराष्ट्रात आणण्यासाठी मी हीच मशाल धगधगत ठेवेन,” अशी शपथ दिली आणि महाविकास आघाडीतील अन्य दोन मित्रांच्या जागा कमी होतील याची तजवीज केली.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.