-
ऋजुता लुकतुके
इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम सर्व्हिसेस ही भारतीय रेल्वेची नोंदणीकृत कंपनी आहे. रेल्वेतील तिकीट बुकिंग आणि देखभालीची सेवा पुरवणारी ही कंपनी १९९९ मध्ये स्थापन झाली. २०१९ च्या सप्टेंबर महिन्यात या कंपनीची शेअर बाजारात नोंदणी झाली. त्या वर्षीचा तो गाजलेला आयपीओ होता. कारण, भारतीय रेल्वेसारखी रेल्वे वाहतुकीत मक्तेदारी असलेली संस्था आणि या संस्थेचीच उपकंपनी असलेली आयआरसीटीसी गुंतवणूकदारांचं लक्ष वेधून न घेती तरंच नवल. त्यानुसार, गुंतवणूकदारांच्या उड्या पडल्या. ६४४ वर नोंदणी झालेला हा शेअर काही दिवसांतच गुंतवणूकदारांना ११५ टक्क्यांचा परतावा देऊन गेला. आताही या शेअरचा ५२ आठवड्यातील उच्चांक १,१३२ इतका आहे. (IRCTC Share Price)
(हेही वाचा- नाशिकच्या Artillery Center स्फोट प्रकरणात ‘कोर्ट ऑफ इन्क्वायरी’चे आदेश)
पण, हा झाला इतिहास. कारण, सध्या पाहिलं तर शुक्रवारी हा शेअर ८८९ अंशांवर बंद झाला आहे. म्हणजेच शेअरमध्ये मागच्या ३ महिन्यात तब्बल ११ टक्क्यांची घसरण झाली आहे. (IRCTC Share Price)
खरंतर आयआरसीटीसी ॲपवर दिवसाला सरासरी ७.३१ तिकीट विक्री होते. तर ॲपचे ६८ लाख नोंदणीकृत ग्राहक आहेत. कंपनीची कामगिरी या तीन महिन्यांत खालावलेली नाही. मग शेअरमध्ये अशी घसरण का झाली? यासाठी दोन महत्त्वाची कारणं देता येतील. (IRCTC Share Price)
एक म्हणजे नवीन आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत कंपनीची आर्थिक कामगिरी फारशी चांगली नव्हती. जून महिन्यात तिमाही निकाल जाहीर झाले तेव्हा कंपनीने प्रत्येक शेअरवर ५ रुपयांचा लाभांश तर दिला. पण, ३०५.६ कोटींचा निव्वळ नफा झाल्याचं जाहीर केलं. पण, हा नफा अपेक्षेपेक्षा कमी होता. तसंच कंपनीचा खर्च वाढल्याचं या कालावधीत दिसून आलं आहे. भांडवली खर्च वाढल्यामुळे एका शेअरमागे गुंतवणूकदारांना मिळणारा परतावा त्या तुलनेत कमी झाला आहे. त्यामुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत कंपनीची कामगिरी ढासळली आहे. त्याचा फटका मे महिन्यापासून कंपनीच्या शेअरलाही बसला आहे. (IRCTC Share Price)
(हेही वाचा- Baba Siddique Shot Dead: … म्हणून Zeeshan Siddiqui थोडक्यात बचावले; काय घडलं निर्मलनगरच्या ऑफिसबाहेर?)
दुसरं कारणही तांत्रिकच आहे. शेअरच्या वाटचालीत गुंतवणुकीवर मिळणारा परतावा म्हणजेच रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट हे गुणोत्तर महत्त्वाचं ठरतं. कंपनीला झालेला निव्वळ नफा आणि भाग भांडवलात शेअर धारकांचा वाटा असं गुणोत्तर म्हणजे रिटर्न ऑन इन्व्हेटमेंट. आणि हे प्रमाण कमी झाल्यामुळे शेअरमध्ये घसरण झाली आहे. (IRCTC Share Price)
(टिप – शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमीची असते. हिंदुस्थान पोस्ट शेअर बाजारातील खरेदी विक्रीसाठी थेट सल्ला देत नाही. गुंतवणूकदारांनी तज्जांच्या सल्ल्याने आणि स्वत:च्या जोखमीवर गुंतवणूक करावी.)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community