“आमचं सरकार आलं की महायुती सरकारचे निर्णय रद्द करू” अशी घोषणा उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी शिवतीर्थावरून केली आहे. त्यामुळे माझ्या लाडक्या बहिणींनो सावध व्हा. महाविकास आघाडीचं सरकार आलं तर लाडकी बहिण योजना बंद पाडली जाईल, असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrasekhar Bawankule) यांनी सांगितले.
(हेही वाचा-Baba Siddique गोळीबाराचं कनेक्शन लॉरेन्स बिष्णोई गँगशी? १५ दिवसांपूर्वी धमकी आणि…)
ते म्हणाले, “याआधी काँग्रेसनं लाडकी बहिण योजनेला विरोध केला. आता उद्धव ठाकरेही तीच भाषा बोलत आहेत. राज्यात महाविकास आघाडीचं सरकार आलं तर लाडकी बहिण योजना, अर्ध्या तिकीटात प्रवास, मोफत वीजबिल, एक रुपयात पीक विमा, शेतकऱ्यांना मिळणारा किसान सन्मान निधी बंद केला जाईल. त्यामुळे सावध व्हा!” असं बावनकुळे (Chandrasekhar Bawankule) म्हणाले आहेत.
(हेही वाचा-Baba Siddique यांच्या हत्येनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, “या प्रकरणातील…”)
उद्धव ठाकरे, तुम्ही केवळ भाजपा आणि महायुती सरकारच्या द्वेषापोटी आमच्या भगिणींच्या पोटावर पाय देऊ पाहत आहेत. सामान्य जनतेला उपाशी ठेऊ पाहत आहेत, ही जनता तुम्हाला कधीच माफ करणार नाही. असेही चंद्रशेखर बावनकुळे (Chandrasekhar Bawankule) म्हणाले आहेत.
हेही पहा-
Join Our WhatsApp Community