-
मुंबई – संतोष वाघ
बाबा सिद्दीकीचे हल्लेखोर एक महिन्यापासून कुर्ल्यात दबा धरून बसले होते.कुर्ल्यातील एका झोपडपट्टीत त्यांनी महिन्याभरापूर्वी भाड्याने घर घेतले होते, त्या ठिकाणी कुरिअरच्या मार्फत त्यांना शस्त्र पुरविण्यात आले होते अशी माहिती आरोपीच्या चौकशीत समोर येत आहे. सिद्दीकी यांच्या हत्येसाठी ३ लाख रुपयांची सुपारी देण्यात आली होती अशी देखील माहिती समोर येत आहे. (Baba Siddiqui)
माजी आमदार बाबा सिद्दीकी यांच्यावर हल्ला करणाऱ्या दोन जणांना पोलिसांनी अटक केली आहे. या दोघांना रात्रीच सुरक्षेच्या कारणास्तव गुन्हे शाखेच्या कक्ष ३ मध्ये आणण्यात आले, या दोघांकडे गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस अधिकारी हे स्वतः चौकशी करीत होते. चकमक फेम पोलीस अधिकारी दया नायक (Daya Nayak) हे स्वतः त्या ठिकाणी हजर राहून आरोपीकडे चौकशी करीत होते. या दोघांच्या चौकशीत हल्ल्याचे नेमके कारण समोर येत नसले तरी, या दोघांनी पळून गेलेल्या तिसऱ्या साथीदाराकडे बोट केले असून “आम्हाला याबाबत काहीही माहिती नसून पळून गेलेल्या तिसऱ्या साथीदारांच्या सांगण्यावरून आम्ही काम करीत होतो, अशी माहिती हे दोघे पोलीस चौकशीत सांगत आहे. (Baba Siddiqui)
(हेही वाचा- Baba Siddique Shot Dead: Zeeshan Siddiqui यांच्या घराबाहेर आरसीपी दल दाखल; बंदोबस्तात वाढ)
हल्लेखोर मूळचे हरियाणा आणि उत्तर प्रदेश राज्यातील असून बाबा सिद्दीकी यांच्या हत्येची त्यांना तीन लाख रुपयांची सूपारी देण्यात आली होती अशी माहिती समोर येत आहे. या सुपारीच्या रकमेपैकी या दोघांना प्रत्येकी ५० हजार रुपये मिळणार होते, तसेच सप्टेंबर महिन्यात हे हल्लेखोर मुंबईत आले होते, मुंबईत आल्यावर त्यांनी कुर्ला पश्चिम सरेल्वे स्थानक परिसरात एका ठिकाणी घर भाड्याने घेऊन राहत होते अशी माहिती चौकशीत समोर येत आहे. बाबा सिद्दीकी यांच्यावर झालेला हल्ला कुठल्या कारणातून झाला अद्याप हे स्पष्ट झाले नसले तरी लॉरेन्स बिष्णोई टोळीचे नाव समोर येत आहे, त्याच बरोबर झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प (एसआरए) च्या वादातून ही हत्या करण्यात आली असल्याचे कारण समोर येत आहे. सिद्दीकी यांच्या हत्येत कुठलाही राजकीय संबंध अद्याप तरी समोर येत नसल्याचे एका पोलीस अधिकारी यांनी म्हटले आहे. (Baba Siddiqui)
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या हल्लेखोरांना शस्त्र कुरियरच्या माध्यमातून पुरविण्यात आले होते, तसेच मागील दीड महिण्यात हे हल्लेखोर कुर्ला ते वांद्रे प्रवासासाठी बेस्ट बस आणि शेअरिंग रिक्षाचा वापर करीत होते, त्यांनी आमदार झिशान सिद्दीकी यांच्या कार्यालयाची तसेच बाबा सिद्दीकी यांच्या घराची रेकी केली होती. बाबा सिद्दीकीयांचा दिनक्रम देखील हल्लेखोरानी जाणून घेतला होता अशी माहिती समोर येत आहे. हल्ल्याच्या दिवशी हल्लेखोर आमदार झिशान सिद्दिकी यांच्या कार्यालया भोवती फिरत होते अशी माहिती समोर येत आहे. (Baba Siddiqui)
(हेही वाचा- Bangladesh: बांगलादेशात हिंदूंच्या प्रार्थनास्थळी होणाऱ्या हल्ल्यांवर केंद्र सरकारकडून गंभीर दखल)
पोलिसांकडून घटनास्थळ तसेच आमदार झिशान सिद्दीकी यांच्या कार्यालयाबाहेर तसेच परिसरातील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले असून ते फुटेज तपासले जात होते. गुन्हे शाखेच्या ताब्यात असलेल्या दोन्ही हल्लेखोरांना अटक करण्यात आली असून त्यांना किल्ला न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. (Baba Siddiqui)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community