Baba Siddique Shot Dead: बाबा सिद्दीकींच्या हत्येनंतर देवेंद्र फडणवीस यांचे शरद पवारांना प्रत्त्युत्तर; म्हणाले…

244
Baba Siddique Shot Dead: बाबा सिद्दीकींच्या हत्येनंतर देवेंद्र फडणवीस यांचे शरद पवारांना प्रत्त्युत्तर; म्हणाले...
Baba Siddique Shot Dead: बाबा सिद्दीकींच्या हत्येनंतर देवेंद्र फडणवीस यांचे शरद पवारांना प्रत्त्युत्तर; म्हणाले...

अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते बाबा सिद्दिकी (Baba Siddique Shot Dead) यांच्यावर शनिवारी रात्री वांद्रे परिसरातील खेरवाडी जंक्शनजवळ गोळीबार करण्यात आला. या हल्ल्यात बाबा सिद्दिकी (Baba Siddique) यांचा मृत्यू झाला आहे. पोलिसांनी याप्रकरणी दोन आरोपींना ताब्यात घेतले आहे. बाबा सिद्दिकी (Baba Siddique) हे त्यांचा मुलगा झिशान सिद्दिकी (Zeeshan Siddiqui) यांच्या कार्यालयातून निघत असताना त्यांच्यावर हल्ला झाला. या घटनेनंतर आता राज्यातील राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. तसेच या या घटनेनंतर राजकीय प्रतिक्रियाही उमटू लागल्या आहेत. (Baba Siddique Shot Dead)

(हेही वाचा-Baba Siddiqui यांचा गोळीबारात झालेला मृत्यू दुर्दैवी, निषेधार्ह आणि वेदनादायी – उपमुख्यमंत्री Ajit Pawar)

या घटनेनंतर देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी लिलावती रुग्णालय या ठिकाणी धाव घेतली होती. तसंच त्यांनी या सगळ्या प्रकरणाची सविस्तर माहिती घेऊन आज माध्यमांशी संवाद साधला. देवेंद्र फडणवीस म्हणाले, “बाबा सिद्दीकी ( Baba Siddique ) आणि माझी चांगली मैत्री होती. त्यांच्या निधनाची बातमी अत्यंत धक्कादायक आणि वेदनादायी आहे. या प्रकरणातले दोन आरोपी पकडण्यात आले आहेत. काही धागेदोरे मिळाले आहेत. त्यातले काही अँगल्सही आम्ही तपासत आहोत. पोलीस याबाबतची योग्य ती माहिती माध्यमांना देतील.” असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले आहेत. (Baba Siddique Shot Dead)

(हेही वाचा-Baba Siddique Shot Dead: Zeeshan Siddiqui यांच्या घराबाहेर आरसीपी दल दाखल; बंदोबस्तात वाढ)

या प्रकरणावरुन शरद पवारांनी (Sharad Pawar) देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचा राजीनामा मागितला यावरही देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्त्युत्तर केलं आहे. देवेंद्र फडणवीस म्हणाले, मला असं वाटतं की, त्यांना (शरद पवार) केवळ सत्ताच पाहिजे आहे. इतकी गंभीर घटना झाल्यानंतरही त्यांच्या नजरेसमोर फक्त खुर्ची आहे, आमच्या नजरेसमोर महाराष्ट्र आहे. आम्हाला महाराष्ट्राकडे पाहायचं आहे, महाराष्ट्राचा विकास करायचा आहे. प्रगती साधायची आहे आणि महाराष्ट्र सुरक्षित ठेवायचा आहे. त्यामुळे त्यांना जर खुर्चीकडे पाहायचं असेल आणि बोलायचं असेल तर त्यांनी ते बोलावं. असं प्रत्युत्तर देवेंद्र फडणवीस यांनी दिलं आहे. बाबा सिद्दीकींच्या घराची रेकी वगैरे झाली हे जे सांगितलं जातं आहे त्याची अधिकृत माहिती नाही. काही अँगल्स लक्षात येत आहेत. मूळ चौकशीवर परिणाम होणार नाही अशी जी माहिती असेल ती पोलीस देतील असंही फडणवीस यांनी स्पष्ट केलं. (Baba Siddique Shot Dead)

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.