-
विशेष प्रतिनिधी,मुंबई
उबाठा शिवसेनेच्या युवा सेनेचे नेते, माजी मंत्री तसेच पक्षाचे नेते असलेल्या आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी १४ वर्षांपूर्वी राजकारणात प्रवेश केला आणि त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज उद्यानातील पक्षाच्या दसरा मेळाव्यात त्यांनी प्रथम भाषण करत शिवसैनिकांना मार्गदर्शन केले. आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) हे यापूर्वीच शिवसेनेचे नेते झालेले असून दसरा मेळाव्यात भाषण करून त्यांनी आपण पक्षाचे वरिष्ठ नेते असल्याचेही दाखवून दिले. मात्र, पक्षाचे नेते होऊन आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) हे युवा सेना अध्यक्षपदाची खुर्ची अडवून बसले आहे. त्यामुळे तेजस ठाकरे यांच्या राजकीय प्रवेशासाठी जोवर पोषक पिच तयार होत नाही तोवर आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) हे युवा सेनेच्या अध्यक्षपदी राहणार आहेत. त्यामुळे पक्षाचा नेता असलेली व्यक्ती युवा सेनेच्या अध्यक्षपदी कशी राहू शकते असा प्रश्न उपस्थित होत आहे.
आदित्य ठाकरे (Aditya Thackeray)यांनी राजकारणात प्रवेश केल्यानंतर २०१०मध्ये युवा सेनेची स्थापन केली. बाळासाहेबांनी शिवतिर्थावर आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांच्या हातात तलवार देवून त्यांचे राजकारणात स्वागत केले आणि हातात ताकद आणि बळ दिले. परंतु मागील दोन ते तीन वर्षांपासून आदित्य ठाकरे हे शिवाजीपार्क वरील दसरा मेळाव्यात भाषण करतील अशी शक्यता वर्तवली जात होती. परंतु तसे न घडता यावर्षी म्हणजे २०२४चा मुहूर्त साधत आदित्यला भाषण करण्याची संधी पक्षाने दिली.
(हेही वाचा – BMC : महापालिका कर्मचाऱ्यांना यंदाही २६ हजार रुपयेच सानुग्रह अनुदान?)
या दसरा मेळाव्यात नितीन बानगुडे पाटील, सुषमा अंधारे, भास्कर जाधव, आदित्य ठाकरे , संजय राऊत यांच्यानंतर उध्दव ठाकरे यांनी भाषण केले. परंतु याच मंचावर चंद्रकात खैरे, सुनील प्रभू, किशोरी पेडणेकर, ज्योती ठाकरे आदी असतानाही त्यांना संधी दिली गेली नाही. त्यामुळे ज्यांनी शिवसेना कोळून पियाले त्यांना पक्षात महत्व दिले जात नाही आणि अंधारे यांच्यासारखी माणसे आज शिवसैनिकांना निष्ठेचे धडे देत आहेत.
या दसरा मेळाव्यात संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांना आपण आता मूल राहिलेला नाहीत तर तर आपण महाराष्ट्राचे नेते झाला आहात,असे सांगितले. त्यामुळे आदित्य ठाकरे हे शिवसेना नेते तसेच महाराष्ट्राचे नेते झाल्याचे म्हटले जात असतानाच दुसरीकडे त्यांच्याकडील युवा सेनेचे अध्यक्षपद कायम आहे. त्यामुळे पक्षाचे नेते आणि आता महाराष्ट्राचे नेते झाल्यानंतर आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) हे युवा सेनेचे अध्यक्षपद कधी सोडणार असा प्रश्न आता शिवसेनिकांमध्ये उपस्थित होत आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community