Baba Siddique Murder : विधानसभा निवडणूक असल्याने अजून आणखी हत्येचा कट रचला असण्याची पोलिसांना वाटते भीती

गुन्हा करण्यापूर्वी हे आरोपी पुणे आणि मुंबई येथे राहिले आहेत. हत्या करण्यासाठी वापरण्यात आलेल शस्त्र आणि वाहन कोणी पुरवले याचा तपास करावा लागेल, असं सरकारी वकील गौतम गायकवाड म्हणाले.

397
बाबा सिद्दीकी (Baba Siddique) यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. याप्रकरणी मुंबई पोलिसांनी दोघांना अटक केली असून त्यांना सुटीकालीन न्यायालयात हजर करण्यात आले होते. मुंबई पोलिसांनी त्यांच्या कोठडीची मागणी केली होती. त्यानुसार त्यांना २१ ऑक्टोबरपर्यंत मुंबई गुन्हे शाखेची कोठडी सुनावण्यात आली आहे. दरम्यान, मुंबई पोलिसांनी न्यायालयात मोठी चिंता व्यक्त केली.
बाबा सिद्दीकी (Baba Siddique) यांच्यावर गोळ्या झाडणाऱ्या तिघांनी लॉरेन्स बिश्नोई टोळीच्या सदस्याची हरियाणातील तुरुंगात भेट घेतली होती. हे तिघेही त्या तुरुंगात विविध गुन्ह्यांसाठी शिक्षा भोगत होते. शिवकुमार गौतम आणि मोहम्मद झीशान अख्तर हे दोघेही या प्रकरणातील संशयित आरोपी असून पोलीस त्यांच्या मागावर आहेत. गौतम हा वांद्रे येथील तीन नेमबाजांपैकी एक होता, तर अख्तरला सिद्दीकीच्या हत्येचा सुपारी मिळाली होती, असं समजते. त्यांची १४ दिवसांची कोठडी मागताना, पोलिसांनी न्यायालयाला कळवले की योग्य कट रचून ही हत्या करण्यात आली आहे. महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक जवळ आल्याने आरोपींनी इतर कोणाचा खून करण्याचा कट आखला होता की नाही हे जाणून घेण्याची गरज आहे, असे पोलिसांनी न्यायालयात सांगितले.

आरोपींनी योग्य निशाणा साधला होता, ते प्रशिक्षित होते का?

गुन्हा करण्यापूर्वी हे आरोपी पुणे आणि मुंबई येथे राहिले आहेत. हत्या करण्यासाठी वापरण्यात आलेल शस्त्र आणि वाहन कोणी पुरवले याचा तपास करावा लागेल, असं सरकारी वकील गौतम गायकवाड म्हणाले. या हत्येमागील कारण आणि या गुन्ह्यात परदेशातील टोळीचा सहभाग आहे का, याबाबत माहिती मिळू शकलेली नाही, असे गायकवाड यांनी सांगितले. “त्यांनी सिद्दीकी (Baba Siddique) यांच्यावर योग्य निशाणा साधला होता. त्यामुळे त्यांना काही प्रशिक्षण देण्यात आले होते का आणि संपूर्ण ऑपरेशनसाठी कोणी निधी दिला होता, याचाही तपास करावा लागेल”, असं सरकारी वकील पुढे म्हणाले.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.