E-Shivai Bus: एसटीच्या ताफ्यात लवकरच १०० नव्या ई-शिवाई बसेस येणार; ‘या’ मार्गांवर बस धावणार

124
E-Shivai Bus: एसटीच्या ताफ्यात लवकरच १०० नव्या ई-शिवाई बसेस येणार; 'या' मार्गांवर बस धावणार
E-Shivai Bus: एसटीच्या ताफ्यात लवकरच १०० नव्या ई-शिवाई बसेस येणार; 'या' मार्गांवर बस धावणार

राज्य परिवहन (एसटी) (ST) महामंडळाच्या ताफ्यात या महिन्याअखेरील १०० नवीन ई-बस (E-Shivai Bus) दाखल होणार आहेत. या बसगाड्या १२ मीटर लांबीच्या असल्याने सध्या धावत असलेल्या ई-बसच्या तुलनेत त्यांची आसनक्षमता अधिक आहे. मुंबई-पुणे मार्गावरील ई-शिवनेरीच्या ताफ्यात १७ नव्या बसगाड्या दाखल झाल्याने ई-शिवनेरी बसगाड्यांची एकूण संख्या १००वर पोहोचली आहे. (E-Shivai Bus)

(हेही वाचा-Baba Siddique यांची हत्या करणारा ‘तो’ आरोपी अल्पवयीन नाहीच; ऑसिफिकेशन टेस्टनंतर सिद्ध)

केंद्र सरकारच्या सूचनेप्रमाणे, सार्वजनिक वाहतूक करणाऱ्या राज्य परिवहन सेवेत अधिकाधिक विद्युत वाहनांचा समावेश करण्याचे सर्वच राज्य सरकारचे धोरण आहे. राज्यातील एसटी महामंडळाच्या ताफ्यात ३० टक्के गाड्या विजेवर चालवण्याच्या उद्देशाने पाच हजार १५० ई-बस भाडेतत्त्वावर घेण्यात येत आहेत. ऑक्टोबर अखेरीस १२ मीटर लांबीच्या नव्या वातानुकूलित ई- बसगाड्या एसटीच्या ताफ्यात दाखल होणार आहेत. (E-Shivai Bus)

(हेही वाचा-NMMT बसेसमधून प्रवास करणाऱ्या महिलांना तिकीट दरात 50% सवलत)

ई-शिवाईच्या नावाने राज्यातील सर्व मार्गांवर टप्प्याटप्प्याने त्या धावणार आहेत. पहिल्या टप्प्यात नागपूर-चंद्रपूरमधील मार्गांवर बस धावणार आहेत. त्यानंतर नाशिक-बोरिवली, नाशिक-छत्रपती संभाजी नगर या मार्गांवर नवीन ई-बस चालवण्याचे नियोजन आहे. सध्या धावत असलेल्या ई-शिवाईच्या तिकीट दरांनुसारच याचेही तिकीट असणार आहे, असे एसटीतील अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. (E-Shivai Bus)

(हेही वाचा-Baba Siddique Murder : विधानसभा निवडणूक असल्याने अजून आणखी हत्येचा कट रचला असण्याची पोलिसांना वाटते भीती)

या १२ मीटरच्या बसची आसनक्षमता ४५ प्रवाशांची आहे. सध्याच्या नऊ मीटरच्या बसची आसनक्षमता ३२ आहे. सध्या राज्यात १३६ ई-मिडीबस (नऊ मीटर लांबीच्या) धावत आहेत. ठाणे, नाशिक, सातारा, नागपूर, चंद्रपूर, छत्रपती संभाजीनगर आणि बीड अशा विभागांत धावणाऱ्या बसगाड्यांना प्रवाशांचा चांगला प्रतिसाद लाभत आहे. (E-Shivai Bus)

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.