मुंबईहून न्यूयॉर्कला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानाला (Air India Flight) बॉम्बने उडवण्याची धमकी (Bomb Threat) मिळाल्याचे समोर आले आहे. धमकी मिळताच तातडीने दिल्ली येथे हे विमान वळवण्यात आले आहे. सध्या हे विमान इंदिरा गांधी आंतरराष्टीय विमानतळावर असल्याचे समजतंय.
(हेही वाचा-E-Shivai Bus: एसटीच्या ताफ्यात लवकरच १०० नव्या ई-शिवाई बसेस येणार; ‘या’ मार्गांवर बस धावणार)
विमानतळ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या नियमांचे काटेकोरपणे पालन केले जात असून प्रवासी आणि विमान कर्मचाऱ्यांचा सुरक्षितता याकडे लक्ष दिले जात आहे. रविवारी रात्री 2 वाजण्याच्या सुमारास हे विमान मुंबईहून न्यूयॉर्कसाठी रवाना झाले होते. मात्र, लगेचच दिल्ली विमानतळावर विमानाला डायवर्ट करण्यात आले आहे. (Air India Flight)
(हेही वाचा-Flight Ticket: दिवाळीच्या तोंडावर विमान प्रवास झाला स्वस्त! वाचा तिकीटांचे दर काय?)
सध्या दिल्ली विमानतळावरच हे विमान थांबवून ठेवण्यात आले आहे. दरम्यान पोलिसांकडून या प्रकरणी सखोल चौकशी करण्यात येत आहे. कोणी मुद्दामून धमकी दिली आहे का? याचा शोध पोलिस घेत आहेत. (Air India Flight)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community