Baba Siddique Murder प्रकरणी 2G स्पेक्ट्रम घोटाळ्यातील आरोपीच्या नावाची चर्चा

गेल्या सहा ते आठ महिन्यांपासून, सिद्दीक आणि त्यांचा मुलगा काँग्रेस आमदार झिशान हे देशातील सर्वात महागड्या रिअल इस्टेट मायक्रो मार्केटपैकी एक असलेल्या वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स (बीकेसी) येथील संत ज्ञानेश्वर नगर आणि भारत नगर या दोन झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्पांना विरोध करत होते.

241

माजी राज्यमंत्री बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात (Baba Siddique Murder) एका बड्या उद्योजकाच्या नावाची चर्चा सुरू आहे. बाबा सिद्दीकी यांची हत्या एका बड्या ‘एसआरए’ प्रकल्पाच्या वादातून झाली असल्याचे वृत्त समोर येत आहे. या हल्ल्यात बाबा सिद्दीकी यांचा मृत्यू झाला असून त्यांचा आमदार पुत्र झिशान सिद्दीकी हा थोडक्यात बचावला आहे. या हत्याकांडात ज्या उद्योजकाच्या नावाची चर्चा सुरू आहे ते नाव आहे शाहिद बलवा. बलवा हे नाव रिअल इस्टेटमध्ये मोठे नाव असून बलवा यांचे 2G स्पेक्ट्रम घोटाळ्यात नाव समोर आले होते, २०११ मध्ये त्यांना अटक देखील झाली होती.

एसआरएच्या वादातून हत्या 

वांद्रे पश्चिम येथे राहणारे माजी राज्यमंत्री बाबा सिद्दीकी यांची शनिवारी रात्री गोळ्या घालून हत्या (Baba Siddique Murder) करण्यात आली. या हत्येप्रकरणी पोलिसांनी दोन हल्लेखोरांना अटक केली असून दोन हल्लेखोर अद्याप फरार आहे. या हत्याकांडात सर्वात प्रथम गँगस्टर लॉरेन्स बिष्णोई याचे नाव समोर आले. या गुन्ह्याचा तपास जस जसा पुढे जात आहे तस तसे या गुन्ह्यातील एक एक पैलू समोर येऊ लागले आहेत. हत्येच्या पहिल्या दिवसापासून ही हत्या एसआरएच्या वादातून झाल्याचे समोर येत होते. कारण बाबा सिद्दीकी हे रिअल इस्टेटच्या व्यवसायात एक यशस्वी व्यवसायिक म्हणून त्यांचे नाव होते. मागील दोन दशकांत ते वांद्रेचे रिअल इस्टेट किंग म्हणून ओळखले जाऊ लागले होते.

(हेही वाचा Baba Siddique यांची हत्या करणारा ‘तो’ आरोपी अल्पवयीन नाहीच; ऑसिफिकेशन टेस्टनंतर सिद्ध)

दोन झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्पांना सिद्दिकींचा होता विरोध

गेल्या सहा ते आठ महिन्यांपासून, सिद्दीक आणि त्यांचा मुलगा काँग्रेस आमदार झिशान हे देशातील सर्वात महागड्या रिअल इस्टेट मायक्रो मार्केटपैकी एक असलेल्या वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स (बीकेसी) येथील संत ज्ञानेश्वर नगर आणि भारत नगर या दोन झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्पांना विरोध करत होते. या ठिकाणी त्यांनी आंदोलन देखील केले होते, तसेच येत्या काळात वांद्रे पूर्व येथे मोठे आंदोलन देखील करण्यात येणार होते. संत ज्ञानेश्वर नगरच्या पुनर्विकास करणाऱ्या कंपनीत 2G स्पेक्ट्रम घोटाळ्यातील शाहिद बलवा यांनी मोठी गुंतवणूक केली होती. त्यांचा हा ड्रीम प्रोजेक्ट् आहे. सिद्दीकी पिता-पुत्राच्या या आंदोलनामुळे त्यांचा ड्रीम प्रोजेक्ट रखडत चालला होता, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. ऑगस्ट महिन्यात झिशानने सरकारी अधिकाऱ्यांना झोपडपट्टी वसाहतीचे सर्वेक्षण करण्यापासून रोखले आणि अधिकाऱ्यांना त्यांचे कर्तव्य बजावण्यात अडथळा आणला होता. (Baba Siddique Murder)

उद्योजक शाहिद बलवा यांच्यावर संशय 

पोलिसांकडून मात्र अद्याप उद्योजक शाहिद बलवा यांच्या नावाला दुजोरा दिला नसून आम्ही सर्व बाजू तपासून बघत असल्याचे पोलीसांचे म्हणणे आहे. एका पोलीस अधिकारी यांनी म्हटले आहे की, सिद्दीकी यांच्या हत्येशी (Baba Siddique Murder) संबंधित आम्ही चारही बाजूने चौकशी करीत आहोत. या प्रकरणात त्या उद्योजक विकासक अथवा व्यवसायिकाचा संबंध आल्यास संबंधित व्यक्तीला चौकशीसाठी बोलावू, परंतु तूर्तास आम्ही फरार असणाऱ्या हल्लेखोरांचा शोध घेत आहोत. हल्लेखोरांच्या चौकशीत ज्या व्यक्तीचे नाव समोर येईल, त्या प्रत्येक व्यक्तीला आम्ही चौकशीसाठी बोलावू असे एका अधिकाऱ्यानी म्हटले आहे.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.