उत्तर प्रदेशातील पोटनिवडणुकीत I.N.D.I. Alliance पुढे मोठे आव्हान

141
झारखंडमधील जागावाटपावरुन I.N.D.I. Alliance मध्ये फूट; राजद स्वतंत्रपणे लढण्याच्या पवित्र्यात
  • प्रतिनिधी 

उत्तर प्रदेशातील विधानसभेच्या १० जागा रिक्त आहेत. त्या भरण्यासाठी महाराष्ट्राच्या निवडणुकीच्या दरम्यान पोटनिवडणूक घेतली जाण्याची शक्यता आहे. त्या पोटनिवडणुकीत विरोधी पक्षांच्या इंडी आघाडीचा राजकीय कस लागेल. कारण समाजवादी पक्षाने काँग्रेसला विश्वासात न घेता काही उमेदवार घोषित केले आहे. यामुळे उत्तर प्रदेशातील या पोटनिवडणुकीत इंडी आघाडी (I.N.D.I. Alliance) समोर मोठे आव्हान असणार आहे. हरियाणाच्या निकालाचा चांगलाच फटका यावेळी काँग्रेसला बसेल असे राजकीय जाणकारांना वाटते.

लोकसभा निवडणुकीत इंडी आघाडीने (I.N.D.I. Alliance) उत्तर प्रदेशात अनपेक्षितपणे मुसंडी मारत भाजपाची घोडदौड रोखली. विरोधकांची ती कामगिरी भाजपाला स्वबळावर बहुमत मिळवण्यापासून रोखण्यात कळीची ठरली. उत्तर प्रदेशात लोकसभेच्या सर्वाधिक ८० जागा आहेत. त्यातील तब्बल ४३ जागा इंडी आघाडीने जिंकल्या. त्या आघाडीचे घटक असणाऱ्या सपाने ३७, तर काँग्रेसने ६ जागा हस्तगत केल्या. त्यामुळे भाजपाचे उत्तर प्रदेशातील संख्याबळ (३३ जागा) एवढं होते.

(हेही वाचा – Baba Siddique Murder प्रकरणी 2G स्पेक्ट्रम घोटाळ्यातील आरोपीच्या नावाची चर्चा)

लोकसभा निवडणुकीतील त्या दमदार कामगिरीची पुनरावृत्ती करण्याचे मोठे आव्हान उत्तर प्रदेशातील पोटनिवडणुकीत इंडी आघाडीपुढे (I.N.D.I. Alliance) असेल. मुळात ती आघाडी पोटनिवडणुकीत शाबूत राहणार का, याचे ठोस उत्तर अद्याप मिळालेले नाही. वरवर पाहता आघाडी कायम राहण्याची ग्वाही सपा आणि काँग्रेस हे दोन्ही पक्ष देत आहेत. मात्र, पोटनिवडणुकीतील जागावाटपावरून त्यांच्यात सहमती होणार का असा प्रश्न तूर्त तरी पुढे आला आहे. त्याचे कारण म्हणजे कॉंग्रेसने पोटनिवडणुकीत निम्म्या म्हणजे ५ जागा लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

तो प्रस्ताव सपाला मान्य होण्याची बिल्कूल शक्यता नसल्याचे मानले जाते. त्याचे कारण म्हणजे उत्तर प्रदेशात काँग्रेसपेक्षा सपाची ताकद कितीतरी अधिक आहे. त्याशिवाय, पोटनिवडणुकीला सामोऱ्या जाणाऱ्या जागांपैकी एकही जागा याआधी काँग्रेसकडे नव्हती. लोकसभा निवडणुकीत ९ आमदारांचा विजय झाल्याने त्यांच्या विधानसभा जागा रिक्त झाल्या. त्याशिवाय, सपाचा आमदार अपात्र ठरल्याने आणखी १ जागा रिक्त झाली. एकूण रिक्त १० जागांपैकी ५ सपा कडे, तर ४ भाजपाकडे होत्या. फूलपूर, गजियाबाद, फूलपूर, करहाल, कुंडरकी, कटेहरी, मांजवा, मीरपूर, या जागांवर ही पोटनिवडणूक होणार आहे. (I.N.D.I. Alliance)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.