दिल्लीच्या आप (AAP) सरकारने दिवाळी सणाला सुरुवात होण्याआधीच फटाक्यांवर पूर्णपणे बंदी लावली आहे. आप सरकारचे म्हणणे आहे की, दिल्लीत होणारे वायुप्रदूषण रोखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र दुसरीकडे पंजाबमधील आप (AAP) सरकार धान्ये कापल्यानंतर उरलेल्या पेंढ्याला (पराली) जाणीवपूर्वक लावली आग रोखू शकले नाही. मुळात पंजाबमध्ये (Punjab) पेंढ्याला लावली जाणारी आग दिल्लीच्या वायूप्रदूषणाचे मुख्य कारण आहे.
दिल्ली प्रदूषण नियंत्रण बोर्ड (DPCC) ने दि. १४ ऑक्टोबर रोजी एक आदेश जारी करत फटाक्यांची निर्मिती, विक्री आणि फोडण्यावर बंदी लावली. ही बंदी दि. १ जानेवारी २०२५ पर्यंत राहिल. यादरम्यान फटाके सापडल्यास संबंधितावर कारवाई केली जाणार आहे. दिल्ली प्रदूषण नियंत्रण बोर्डाने दिल्ली पोलिसांना यासंबंधातील कारवाईचे आदेश दिले आहेत. ज्यात दिवाळीत फटाके फोडण्याआधीच दिल्लीतील हवा प्रदूषित होत आहे. दि. १४ ऑक्टोबर रोजी दिल्लीच्या आनंद विहारमध्ये प्रदुषणाचा स्तर AQI ३०२ च्या वर होते, जे मानवासाठी अत्यंत घातक आहे.
( हेही वाचा : Baba Siddique Murder प्रकरणी 2G स्पेक्ट्रम घोटाळ्यातील आरोपीच्या नावाची चर्चा)
दिल्लीच्या आप (AAP) सरकराने एका बाजूला राजधानीत फटाक्यांवर प्रदुषणाच्या कारणाने बंदी आणली आहे. तेव्हाच पंजाबमध्ये पेंढ्यांना जाळण्याची प्रथा अजूनही सुरुच आहे. वृत्तसंस्थांनी दिलेल्या माहितीनुसार, पंजाबमध्ये (Punjab) ८०० हून अधिक पेंढ्या जाळण्याच्या घटना उघडकीस आल्या आहेत. त्यात धान्यांची कापणी अद्याप पूर्ण झालेली नाही.
पंजाबच्या तरनतारन, अमृतसर, पटियाला आणि संगरुरमध्ये सर्वाधिक पेंढ्या जाळण्याच्या घटना समोर आल्या आहेत. पंजाबमध्ये आप सरकार आहे, मात्र आप (AAP) सरकार ते रोखू शकले नाही. २०२३ मध्ये देशात पेंढ्या जाळण्याच्या सर्वाधिक घटना पंजाबमधील होत्या. २०२३ मध्ये पेढ्या (पराली)जाळल्याने होणाऱ्या प्रदुषणात पंजाबचा (Punjab) ९३ टक्के वाटा होता. पंजाबमध्ये २०२३ ला पेंढ्या जाळण्याच्या ३६ हजार ६६३ घटना घडल्या होत्या. हरियाणात पेंढ्या (पराली)जाळण्याच्या २ हजार ३०३ घटना घडल्या होत्या. दरम्यान पंजाबमधील काही शहरांचा AQI स्तर खराब झाला होता.
हेही पाहा :
Join Our WhatsApp Community