Uddhav Thackeray यांच्यावर दुसऱ्यांदा झाली अँजिओप्लास्टी

223

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर मुंबईतील एच.एन रिलायन्स रुग्णालयात अँजिओप्लास्टी झाली. काही वर्षांपूर्वी ठाकरेंची अँजिओप्लास्टी झाली होती. सोमवारी ते नियमित तपासणीसाठी आले असता त्यांच्या हृदयातील धमण्यामध्ये ब्लॉकेज आढळून आले.

(हेही वाचा Baba Siddique Murder प्रकरणी 2G स्पेक्ट्रम घोटाळ्यातील आरोपीच्या नावाची चर्चा)

नियमित तपासणीसाठी गेले होते 

याआधी २०१२ साली ठाकरेंवर (Uddhav Thackeray)  लिलावती रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यात आली होती. त्यावेळीही त्यांच्यावर अँजिओप्लास्टी करण्यात आली होती. सोमवार, १४ ऑक्टोबर रोजी उद्धव ठाकरे हे सकाळी ८ वाजता  एच.एन रिलायन्स रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाले होते. त्यावेळी त्यांच्या हृदयाच्या धमण्यामध्ये ब्लॉकेज आढळून आले. त्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्याने त्यांच्यावर तात्काळ अँजिओप्लास्टी  करण्यात आली. अँजिओप्लास्टी एक अशी शस्त्रक्रिया आहे ज्याचा उपयोग करून ह्दयाला रक्तपुरवठा करणाऱ्या धमन्यांमध्ये ब्लॉक झालेल्या धमन्या उघडण्यासाठी केला जातो. अँजिओप्लास्टी ओपन हार्ट सर्जरीशिवाय हृदयाच्या स्नायूंमध्ये रक्त प्रवाह पुनर्संचयित करते. हृदय विकाराचा झटका येणे यांसारख्या आपातकालीन स्थितीत अँजिओप्लास्टी केली जाते.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.