- ऋजुता लुकतुके
श्रीलंकेचा दिग्गज फलंदाज महेला जयवर्धने मुंबई इंडियन्स फ्रँचाईजीचा मुख्य प्रशिक्षम म्हणून परतला आहे. गेली दोन वर्षं तो मुंबई इंडियन्सचा जागतिक क्रिकेट प्रशासनाचा प्रमुख म्हणून काम करत होता. आता तो आयपीएलमध्ये परतणार आहे. जयवर्धनेच्या अनुपस्थितीत माईक बाऊचरवर ही जबाबदारी सोपवली होती. पण, यंदाच्या हंगामात मुंबई इंडियन संघ बाद फेरीतही पोहोचू शकला नाही. त्यानंतर फ्रँचाईजी मालकांनी जयवर्धनेला पुन्हा आयपीएलमध्ये आणण्याचा निर्णय घेतला आहे. यापूर्वी २०१७ ते २०२२ दरम्यान महेला जयवर्धनेच मुंबई इंडियन्सचे मुख्य प्रशिक्षक होते.
महेला जयवर्धने मधल्या दोन वर्षांत मुंबई इंडियन्स महिला फ्रँचाईजी आणि मुंबई इंडियन्स न्यूयॉर्क फ्रँचाईजी सांभाळत होते. आणि या दोन्ही संघांनी या काळात एकेक विजतेपदही पटकावलं आहे. पण, २०२४ च्या हंगामात मुंबई इंडियन्स संघ गुणतालिकेत तळाला राहिला. त्यानंतर ४७ वर्षीय महेला जयवर्धने पुन्हा एकदा संघाचे मुख्य प्रशिक्षक करण्यात आलं आहे. (IPL 2025)
(हेही वाचा – उत्तर प्रदेशातील पोटनिवडणुकीत I.N.D.I. Alliance पुढे मोठे आव्हान)
𝟙𝟟, 𝟭𝟴, 𝟙𝟡, 𝟚𝟘, 𝟮𝟭, 𝟮𝟮 & 𝗔𝗚𝗔𝗜𝗡!
Welcome back, 𝗛𝗲𝗮𝗱 𝗖𝗼𝗮𝗰𝗵 𝗠𝗮𝗵𝗲𝗹𝗮 𝗝𝗮𝘆𝗮𝘄𝗮𝗿𝗱𝗲𝗻𝗲 💙#MumbaiMeriJaan #MumbaiIndians | @MahelaJay pic.twitter.com/c1OvP9OZSZ
— Mumbai Indians (@mipaltan) October 13, 2024
मुंबई इंडियन्सनी यापूर्वी पाचवेळा आयपीएलचं विजेतेपद पटकावलं आहे. मुंबई इंडियन्सचा मालक आकाश अंबानी यांनी जयवर्धनेच्या मुंबई वापसीचं स्वागत केलं आहे. ‘जागतिक संघ उभे करण्यात महेला जयवर्धने यांची महत्त्वाची भूमिका होती. पण, ते काम आता चोख पार पडलं आहे. त्यामुळे महेला जयवर्धने मुंबई इंडियन्सकडे परतू शकतो. त्याचं नेतृत्व, क्रिकेटवरील प्रेम आणि क्रिकेटची जाण याचा मुंबई इंडियन्सला फायदाच झाला आहे. मुंबई इंडियन्सचा तो अविभाज्य भाग आहे,’ असं आकाश अंबानी यांनी म्हटलं आहे. (IPL 2025)
(हेही वाचा – State Govt कडून ऑलिम्पिक खेळाडूंचा सन्मान)
View this post on Instagram
जयवर्धने यांना नेमणूक झाल्या झाल्या एक महत्त्वाची कामगिरी निभावायची आहे. आयपीएलच्या पुढील हंगामासाठीचा मेगा लिलाव नोव्हेंबरमध्ये होणार आहे. आणि त्यापूर्वी ६ खेळाडूंना कायम ठेवण्याची मुदत ३१ ऑक्टोबर आहे. त्यामुळे कोणते खेळाडू कायम राखायचे आणि लिलावात कुणावर बोली लावायची याची रणनीती ठरवणं हे जयवर्धनेचं मुख्य काम असणार आहे. (IPL 2025)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community