India ने कॅनडाला सुनावले; पुरावे द्या नाहीतर गप्प बसा

109

भारत (India) आणि कॅनडा यांच्यातील राजकीय संबंध अधूनमधून ताणले जातात. कारण कॅनडाचे ट्रुडो सरकार राजकीय लाभासाठी भारतावर बिनबुडाचे आरोप करत असते, त्याला भारताने सडेतोड उत्तर दिले आहे. आरोप करण्याआधी पुरावे द्या, नाहीतर गप्प बसा, असा दम भारताने दिला आहे.

भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने एक निवेदन जारी करून हे ट्रूडो (Justin Trudeau) यांचा राजकीय डाव असल्याचे म्हटले आहे. परराष्ट्र मंत्रालयाने जारी केलेल्या निवेदनानुसार, रविवारी कॅनडातून एक राजकीय संदेश प्राप्त झाला, ज्यामध्ये कॅनडात उपस्थित भारतीय उच्चायुक्त आणि राजनयिकांना एका प्रकरणात ‘पर्सन ऑफ इंटरेस्ट’ म्हणून वर्णन केले आहे. म्हणजेच कॅनडाचे सरकार या प्रकरणात भारतीय (India) उच्चायुक्त आणि मुत्सद्दींना संशयित मानत आहे. ते कोणत्या प्रकरणात संशयित आहे, हे सांगण्यात आले नसले तरी हे संपूर्ण प्रकरण दहशतवादी हरदीप सिंह निज्जरच्या हत्येशी संबंधित असल्याचे मानले जात आहे.

(हेही वाचा Conversion : शोएबचा हिंदू महिलेवर धर्मांतरासाठी दबाव, हिंदू संघटनांच्या कार्यकर्त्यांनी दिला चोप)

कॅनडा सरकारच्या या तथ्यहीन आरोपांवर भारताने जोरदार टीका केली आहे. परराष्ट्र मंत्रालयाने ट्रूडो सरकारने केलेले आरोप बिनबुडाचे असल्याचे म्हटले आहे. पंतप्रधान जस्टिन ट्रूडो हे त्यांच्या राजकीय अजेंडामुळे असे निराधार आरोप करून भारताची (India) प्रतिमा डागाळण्याचा प्रयत्न करत आहेत, असा घणाघाती आरोप भारताने ट्रूडो सरकार वर केले. तसेच, ट्रूडो सरकार व्होटबँकच्या राजकारणासाठी हा प्रकार करत असल्याचे भारत सरकारने म्हटले आहे. परराष्ट्र मंत्रालयाने जारी केलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की, ट्रूडो यांनी सप्टेंबर २०२३ मध्ये बिनबुडाचे आरोप केल्यापासून, कॅनडाच्या सरकारने एकही पुरावा सादर केलेला नाही.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.