Ashish Shelar मतदारसंघ बदलणार?

167
Ashish Shelar मतदारसंघ बदलणार?
  • खास प्रतिनिधी 

वांद्रे पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार भाजपाचे आशिष शेलार (Ashish Shelar) येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत मतदारसंघ बदलणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे. शेलार विले पार्ले पूर्व किंवा दहिसरमधून निवडणूक लढणार असल्याचे बोलले जात आहे.

(हेही वाचा – वन नेशन वन रेशन कार्ड योजना लागू करण्यासाठी Bombay High Court मध्ये जनहित याचिका)

काँग्रेसकडून प्रिया दत्त?

काही दिवसांपूर्वी मुंबई काँग्रेस अध्यक्षा वर्षा गायकवाड आणि माजी मंत्री अस्लम शेख यांनी काँग्रेसच्या माजी खासदार प्रिया दत्त यांची त्यांच्या घरी जाऊन भेट घेतली आणि वांद्रे पश्चिममधून विधानसभा निवडणूक लढावी यासाठी आग्रह धरला गेला. त्यांनी स्पष्ट होकार दिला नसला तरी नकारही दिला नाही. उमेदवारीचा निर्णय पक्ष घेईल असे सांगितले. मात्र पक्षाकडून दत्त यांना उमेदवारी मिळेल अशी शक्यता वर्तवली जात असल्याने वांद्रे पश्चिममधील भाजपा कार्यकर्त्यांमध्ये उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे.

(हेही वाचा – Bandra मतदारसंघात Congress मध्ये बंडखोरीची शक्यता; उमेदवारीचा वाद थेट राहुल गांधी दरबारी!)

पराभूत झाल्यास कार्यकर्ते डळमळतील

आशिष शेलार (Ashish Shelar) ही मुंबई भाजपाचे अध्यक्ष असून प्रिया दत्त यांच्या उमेदवारीमुळे शेलार यांची पुन्हा निवडून येण्याची शक्यता कमी दिसू लागल्याने त्यांनी मतदारसंघ बदलण्याचे प्रयत्न सुरू केल्याची चर्चा आहे. पक्षात आशिष शेलार यांचे वजन वाढल्यामुळे तसेच मुंबई अध्यक्ष पदाची जबाबदारी असून असा नेता निवडणुकीत पराभूत झाल्यास कार्यकर्त्यांच्या आत्मविश्वास डळमळीत होऊ शकतो. यामुळे विले पार्ले पूर्व किंवा दहिसरचा त्यांच्यासाठी विचार होऊ शकतो, असे बोलले जात आहे. परिणामी पार्लेचे भाजपा आमदार पराग अळवणी तसेच दहिसरच्या भाजपा आमदार मनीष चौधरी यांची उमेदवारी धोक्यात येऊ शकते.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.