नानांच्या पत्राने गोंधळ, आरोप नेमका कुणावर?

नाना पटोले यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहित महाजनको कंपनीला कोळसा पुरवणाऱ्या कोळसा वॉशिंगच्या कंत्राटाच्या निविदेवर पटोले यांनी आक्षेप घेतला आहे.

115

गेल्या काही दिवसांपासून नाना पटोले प्रचंड आक्रमक असून, आता तर त्यांनी शिवसेनेकडे असलेल्या महाराष्ट्र राज्य खनिकर्म महामंडळानं राबवलेल्या निविदा प्रक्रियेवर आक्षेप घेतला आहे. नाना पटोले यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहित महाजनको कंपनीला कोळसा पुरवणाऱ्या कोळसा वॉशिंगच्या कंत्राटाच्या निविदेवर पटोले यांनी आक्षेप घेतला आहे. संजय हरदानी चालवत असलेल्या रुखमाई इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी गैरमार्गाने पात्र ठरल्याचा आक्षेप पटोले यांनी घेतला आहे. महाराष्ट्र राज्य खनिकर्म महामंडळ रुखमाई इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीला जे कंत्राट देण्यात येणार आहे, त्याला स्थगिती देण्याची मागणी नाना पटोले यांनी केली आहे. या महामंडळाच्या अध्यक्षपदी शिवसेनेचे आमदार आशिष जयस्वाल आहेत.


(हेही वाचा : मराठा आरक्षणावरील केंद्राची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली)

उर्जामंत्र्यांवर आरोप केल्याची चर्चा

सगळ्यात महत्वाचे नाना पटोले यांनी हे पत्र मुख्यमंत्र्यांना लिहिल्यानंतर त्यांनी आपल्याच पक्षाच्या मंत्र्यांवर म्हणजेच ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांच्यावर आरोप केल्याची चर्चा सुरू झाली होती. मात्र त्यानंतर नाना पटोले यांनी याचे स्पष्टीकरण दिले आहे. आपण ऊर्जा विभागाशी संबंधित पत्र लिहिले नसून ते पत्र खनिकर्म महामंडळातील टेंडरबाबत आहे. आणि या महामंडळाचा ऊर्जा विभागाशी काही संबंध नाही, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी स्पष्ट केले आहे. ऊर्जा विभागाविरोधात पत्र लिहिल्याची खोटी बातमी दाखवून आमच्याच पक्षाचे मंत्री नितीन राऊत आणि माझ्यामध्ये भांडण लावण्याचा प्रयत्न केला, जात असल्याचे म्हणत बातमी दाखवण्यापूर्वी त्याची खातरजमा करण्याच्या साध्या प्रक्रियेचे पालनही केले नाही. अशा प्रकारच्या निराधार, असत्य बातम्या दाखवण्याचे प्रकार भविष्यात होणार नाहीत याची काळजी घ्यायला हवी असे नाना म्हणाले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.