- ऋजुता लुकतुके
हॉकी इंडिया लीगसाठी (Hockey India League) खेळाडूंच्या लिलावात पहिल्या दिवशी भारतीय कर्णधार हमनप्रीत सिंगसाठी अपेक्षेप्रमाणेच सर्वाधिक मोठी बोली लागली. सुरमा क्लबने त्याला ७८ लाख रुपयांत विकत घेतलं. आघाडीच्या फळीतील ड्रॅगफ्लिकर आणि पेनल्टी कॉर्नर तज्ज अशी हरमनप्रीतची ओळख आहे. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये त्याच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने कांस्य पदक जिंकलं. भारतीय संघ तिसरा आला असला तरी स्पर्धेत सर्वाधिक गोल हरमनप्रीतच्या नावावर होते. हॉकी लीगच्या या लिलावात संघ मालक भारतीय खेळाडूंवरच जास्त भरवसा ठेवताना दिसले. त्यामुळे सर्वाधिक बोली लागली ती भारतीय खेळाडूंवरच.
हरमनप्रीतच्या खालोखाल अभिषेकवर बंगाल टायगर्सनी ७२ लाखांची बोली लावली. तर हार्दिक सिंगला युपी रुद्राजने ७० लाख रुपयांना विकत घेतलं. आघाडीचा बचावपटू अमित रोहिदासवर तामिळनाडू वॉरिअर्सनी ४८ लाखांची बोली लावली. तर जुगराज सिंग बंगाल टायगर्सकडे गेला. रविवारच्या दिवशी लिलावाच्या पहिल्या टप्प्यात एकूण ५४ खेळाडू विकले गेले. आणि ८ संघ मालकांनी मिळून एकूण १६ कोटी ८८ लाख ५० हजार रुपयांची खरेदी केली. (Hockey India League)
(हेही वाचा – Jharkhand money laundering case : झारखंडमध्ये ईडीची मोठी कारवाई ; मनी लाँड्रिंग प्रकरणात 20 हून अधिक ठिकाणी छापे)
Day 1 of the Hockey India League Auction is in the books, and the squads are starting to take shape! 🏑
Stay tuned for Day 2 as the action continues to heat up! 🔥🔗Link: https://t.co/FKyZT237J9
Broadcast starts 10:00am on 14th October’24.#HockeyIndiaLeague #HILPlayerAuction pic.twitter.com/MpPnXhD470— Hockey India League (@HockeyIndiaLeag) October 13, 2024
आंतरराष्ट्रीय खेळाडूंमध्ये जर्मनीच्या गोंझालो पेलाटवर ६८ लाख रुपयांची बोली लागली. तामिळनाडू ड्रॅगन्सनी त्याला विकत घेतलं. तामिळनाडू ड्रॅगन्सनीच नेदरलँड्सच्या यिप यानसेनला ५८ लाखांत विकत घेतलं. गोलींमध्ये आयर्लंडच्या डेव्हिड हार्टेला सर्वाधिक पैसे मिळाले. तामिळनाडू ड्रॅगन्सनी त्याला ३२ लाख रुपयांत विकत घेतलं. तर जर्मनीचा जीन पॉल डॅनबर्गला हैद्राबाद तुफानकडून २७ लाख रुपये मिळणार आहेत. भारताचा गोलकीपर सूरज करकेराला गोनामिका संघाने २३ लाखांत विकत घेतलं. तर दुसरा गोलकीपर पवन १५ लाखांत दिल्ली संघाच्या ताफ्यात गेला आहे. (Hockey India League)
७ वर्षांनंतर हॉकी इंडिया लीग पुन्हा परतली आहे. आणि यंदा खेळाडूंचा लिलाव १४ ते १६ तारखेदरम्यान होणार आहे. यात पहिल्या दोन दिवशी पुरुष खेळाडूंसाठी तर तिसऱ्या आणि अंतिम दिवशी महिला खेळाडूंचा लिलाव पार पडेल. पुरुषांच्या लीगमध्ये हैद्राबाद तुफान, सुरमा हॉकी क्लब, श्राची रथ बंगाल टायगर्स, दिल्ली एसजी पायपर्स, तामिळनाडू ड्रॅगन्स, युपी रुद्राज, कलिंगा लान्सर्स आणि टीम गोनासिका हे ८ फ्रँचाईजी संघ सहभागी होणार आहेत. (Hockey India League)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community