विज्ञानवादी सावरकर या विषयावर डॉ. गिरीश पिंपळे यांचे ऑनलाइन व्याख्यान

125

क्रांतिकारकांचे शिरोमणी असलेल्या देशभक्त, साहित्यिक, हिंदुत्वनिष्ठ अशा विविध गुणविशेषणांनी भारलेल्या स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी मार्सेलीस बंदरात जाण्यासाठी बोटीतून सागरात उडी मारली आणि ब्रिटिशांच्या कैदेतून सुटका करण्याचा पराक्रम केला. या प्रसंगाला १११ वर्षे होत आहेत. या प्रसंगाचे औचित्य साधत मराठी विज्ञान परिषद आणि स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या संयुक्त विद्यमाने बुधवार ७ जुलै रोजी सायंकाळी ६ वाजता सावरकर चरित्राचे अभ्यासक आणि भौतिकशास्त्राचे प्राध्यापक, डॉ. गिरीश पिंपळे (नाशिक) यांचे ऑनलाइन व्याख्यान आयोजित केले आहे.

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या विज्ञान विषयक विचारांकडे समाजाचे लक्ष जावे, असा उद्देश यामागे आहे. हे व्याख्यान विनामूल्य आणि सर्वांसाठी खुले असून, अधिक माहिती आणि नोंदणीसाठी https://mavipa.org/events/swrkr या लिंकवर क्लिक करावे.

मराठी विज्ञान परिषदेचे कार्य

मराठी विज्ञान परिषद गेली ५६ वर्ष समाजात विविध मार्गाने विज्ञान प्रसाराचे कार्य करत आहे. महाराष्ट्र व महाराष्ट्राबाहेर मराठी भाषिक लोक असलेल्या बृहन्महाराष्ट्रात विज्ञान परिषदेचे ७२ विभाग आहेत. सध्याच्या बदललेल्या परिस्थितीत संपर्क स्थापक प्रणालीद्वारे विविध उपक्रम परिषद करत आहे. त्यातीलच हा एक व्याख्यानाचा उपक्रम असून, तो मराठी विज्ञान परिषद व स्वा. सावरकर स्मारक यांच्या संयुक्त विद्यमाने साकार होत आहे. मराठी विज्ञान परिषदेचे कार्यवाह जयंत जोशी आणि स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्यवाह राजेंद्र वराडकर यांनी संयुक्तपणे ही माहिती दिली आहे

स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक आणि मराठी विज्ञान परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने नाशिक येथील सावरकर चरित्राचे अभ्यासक आणि भौतिकशास्त्राचे प्राध्यापक, डॉ. गिरीश पिंपळे याचे ऑनलाइन व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. हे व्याख्यान बुधवारी ७ जुलै २०२१ या दिवशी सायंकाळी ६ वाजता झूमच्या माध्यमातून होत आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.