हरहुन्नरी, अभिनय संपन्न अभिनेते अतुल परचुरे यांची अकाली एक्झिट मनाला चटका लावून जाणारी आहे. त्यांच्या निधनामुळे एका गुणी कलाकाराला आपण मुकलो आहोत, अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी अभिनेता अतुल परचुरे (Actor Atul Parchure) यांना श्रद्धांजली वाहिली आहे. (Atul Parchure)
चतुरस्त्र अभिनेत्याची अकाली एग्झिट :
रसिक प्रेक्षकांना कधी खळखळून हसवणारे, कधी डोळ्यात आसू उभे करणारे. कधी अंतर्मुख करणारे अभिजात अभिनेते अतुल परचुरे यांचे अकाली निधन वेदनादायी आहे. अतुल परचुरे यांनी बालरंगभूमीपासू्नच आपली देदिप्यमान अभिनय कारकीर्द गाजवली. नाटक, चित्रपट, मालिका… pic.twitter.com/RqvCuXSmCn
— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) October 14, 2024
(हेही वाचा – Carnac Bridge : मशीद बंदर रेल्वे स्थानकाजवळील कर्नाक पुलाचा पहिला गर्डर चढला)
शोकसंदेशात मुख्यमंत्री (CM Eknath Shinde) म्हणतात, बालरंगभूमी पासून त्यांची अभिनयाची (Marathi Actor) कारकीर्द सुरू झाली. त्यांनी मराठी रंगभूमीवर आपल्या सहज, टवटवीत अभिनयाने छाप उमटवली. मराठी आणि हिंदी अशा दोन्हीतील नाटक, मालिका चित्रपट (Marathi Movie) आणि जाहिरात या क्षेत्रांत त्यांनी ओळख निर्माण केली. शाब्दिक, वाचिक विनोद यांमध्ये त्यांनी अंगभूत गुणांनी रंग भरले. त्यांच्या निधनामुळे एक गुणी, अभिनय संपन्न कलाकाराला आपण मुकलो आहोत. ही कला क्षेत्राची मोठी हानी आहे. परचुरे यांच्या असंख्य चाहत्यांपैकी एक म्हणून मी त्यांच्या कुटुंबीयांच्या दु:खात सहभागी आहे. ईश्वराने त्यांना हे दु:ख सहन करण्याचं बळ द्यावी अशी प्रार्थना करून मुख्यमंत्र्यांनी ज्येष्ठ अभिनेते अतुल परचुरे (Atul Parchure Death) यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
हेही पाहा –
Join Our WhatsApp Community