- प्रतिनिधी
माजी राज्यमंत्री बाबा सिद्दीकी (Baba Siddique) यांचे तिघे मारेकरी कुर्ला पश्चिम येथील पोलीस पटेल चाळीत भाड्याने खोली घेऊन २० दिवसांपासून त्या ठिकाणी राहत होते. गुन्हे शाखेच्या पोलिसांनी रविवारी पहाटे घराची झडती घेतली मात्र घरात काहीही आक्षेपार्ह आढळून आले नाही. दरम्यान पोलिसांनी घरापासून काही अंतरावर पार्क करण्यात आली मोटार सायकल ताब्यात घेतली असून ही मोटार सायकल सिद्दीकी यांचे मारेकरी वापरत होते अशी माहिती स्थानिकांनी दिली आहे.
वांद्रे पश्चिम येथे राहणारे राष्ट्रवादी अजित गटाचे नेते तसेच माजी राज्यमंत्री बाबा सिद्दीकी (Baba Siddique) यांच्यावर शनिवारी रात्री वांद्रे पूर्व खेरनगर जंक्शन या ठिकाणी तीन जणांपैकी एकाने ६ गोळ्या झाडून हत्या केली. हा हल्ला देवी विसर्जन सुरू असताना झाल्यामुळे फटाक्याच्या आतिषबाजीमुळे गोळीबाराचा आवाज कोणाला ऐकू आला नाही. या गोळीबारात बाबा सिद्दीकी यांचा मृत्यू झाला आहे. दोन हल्लेखोरांना घटनेच्या २५ मिनिटात निर्मल नगर पोलिसांनी अटक केली.
(हेही वाचा – Baba Siddique Murder Case : शुभु लोणकरच्या भावाला २१ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी)
धर्मराज कश्यप (१९) आणि गुरमेलसिंग (२३) असे अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे असून त्यांचा एक साथीदार शिवकुमार गौतम हा पळून जाण्यास यशस्वी झाला. बाबा सिद्दीकी (Baba Siddique) यांच्यावर गोळीबार शिवकुमार याने केला होता, व यामध्ये शिवकुमार गौतम हा मुख्य शूटर होता. हे तिघे दीड महिन्यापूर्वी मुंबईत आले होते, पुण्यात शुभु लोणकर यांनी त्यांना पुण्यात कामाला ठेवले होते. या दोघांना पुण्यात वापरण्यासाठी त्यांना एक अपाची मोटारसायकल देण्यात आली होती, तसेच त्यांना टार्गेटचा (बाबा सिद्दीकी) बॅनरवरील फोटो दिले होते. १५ ते २० दिवसांपूर्वी तिन्ही शूटर्सनी कुर्ला पश्चिम जुना धोबी घाट येथील मायकल हायस्कुल जवळ असणाऱ्या पोलीस पटेल या चाळीत १४ हजार महिना घर भाड्याने घेतले होते. हे घर नरेश नावाच्या व्यक्तीचे असून ती व्यक्ती बुद्ध कॉलनी येथे राहण्यास होता, सिद्दीकी (Baba Siddique) यांचे मारेकरी या चाळीत राहून घरात सिद्दीकीच्या हत्येची योजना आखत होते.
स्थानिक नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार आम्ही मागील १५ ते २० दिवसापासून या तिघांना या खोलीत राहत असल्याचे बघितले आहे. त्यापैकी एक जण उच्च शिक्षित असावा कारण ते स्पष्टपणे इंग्रजी भाषेत बोलत असायचा, हे तिघे बाहेरून नाश्ता जेवण घरातच आणून खात होते, घरात पाणी पिण्यासाठी एकही भांडे नव्हते, पाण्यासाठी त्यांनी मिनरल पाण्याच्या बॉटलचा वापर करीत होते, अशी माहिती एका स्थानिकांनी दिली, त्यांच्या शेजारी राहणारा मोईन नावाच्या व्यक्तीने सांगितले की, हे तिघे खूप शांत राहायचे, दिवसभर घरात असायचे आणि रात्री ८ नंतर घराबाहेर पडायचे. पोलिसांनी या तिघे वापरत असलेली अपाची मोटारसायकल (एमएच १७ एपी- २९७२) ही ताब्यात घेतली असून ही गाडी श्रीरामपूर येथील असल्याचे समजते, या गाडीवर पुणे आणि पिंपरी चिंचवड येथे वाहतूक पोलिसांचा दंड बाकी असून ही गाडी चोरी केली असावी अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. (Baba Siddique)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community