Baba Siddique हत्या प्रकरणी फेसबुक आणि इन्स्टाग्रामकडे मागवली माहिती!

168
Baba Siddique हत्या प्रकरणी फेसबुक आणि इन्स्टाग्रामकडे मागवली माहिती!
Baba Siddique हत्या प्रकरणी फेसबुक आणि इन्स्टाग्रामकडे मागवली माहिती!

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दिकी (Baba Siddique) यांच्या हत्या प्रकरणी अटक केलेल्या आरोपींची पोलिसांकडून चौकशी सुरु आहे. पोलिसांनी या प्रकरणात आतापर्यंत धर्मराज कश्यप, गुरमैल सिंग आणि प्रवीण लोणकर या तिघांना अटक करण्यात आली आहे. तर, मोहम्मद झीशान अख्तर, शिवकुमार गौतम आणि शुभम लोणकर (Shubham Lonkar) हे तिघे फरार आहेत. बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणात बिश्नोई गँगचं (Bishnoi Gang) पुणे, हरियाणा आणि पंजाब यूनिट कार्यरत असल्याची माहिती समोर आली आहे.

(हेही वाचा-Bandra Government Colony तील कर्मचाऱ्यांना त्याच ठिकाणी घरासाठी मिळणार भूखंड)

बाबा सिद्यिकी (Baba Siddique) हत्या प्रकरणी पोलिसांनी सोशल मिडीया पोस्ट व्हायरल झाली होती. याची आता माहिती मागवण्यात आली आहे. सोशल मीडियावरील पोस्ट प्रकरणी पोलिसांनी फेसबुक आणि इन्स्टाग्रामकडून माहिती मागवली आहे. बाबा सिद्दिकी (Baba Siddique) यांच्या हत्या प्रकरणात शुभम लोणकर आणि प्रवीण लोणकर यांनी पैसे आणि शस्त्र पुरवण्यामध्ये मदत करत होते. शुभम लोणकर एका महिन्यापासून फरार आहे. शुभम आणि प्रवीण लोणकर यांना कोण निर्देश देत होता याचा तपास करण्यात येत आहे.

(हेही वाचा-चतुरस्त्र अभिनेत्याची अकाली एक्झिट! अभिनेते Atul Parchure यांच्या निधनानंतर CM Eknath Shinde यांनी वाहिली श्रद्धाजंली)

पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार, मुंबई पोलिसांनी सलमान खानच्या घरावर करण्यात आलेल्या गोळीबार प्रकरणी शुभम लोणकर, सौरभ महाकाळची चौकशी केली होती. सलमान खान याच्या घरावर गोळीबार करण्यात आला होता त्यामध्ये शुभम लोणकरची कोणती भूमिका समोर आली नव्हती त्यामुळं त्याला सोडून देण्यात आलं होतं. (Baba Siddique)

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.