खलिस्तानी कार्यकर्ता हरदीप सिंह निज्जरला (Hardeep Singh Nijjar) भारत सरकारने दहशतवादी (Khalistan Movement) घोषित केलेले होते. त्याची १८ जून २०२३ रोजी कोलंबियात एका गुरुद्वाराबाहेर गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. त्यानंतर कॅनडा सरकारने थेट भारत सरकारवर आरोप केले होते. यामुळे भारत आणि कॅनडातील संबंध ताणले गेले आहेत. नुकतेच भारताचे उच्चायुक्त आणि इतर उच्च अधिकाऱ्यांवर पुराव्यांविना करण्यात आलेले आरोप स्वीकारले जाणार नाही, अशी भूमिका भारत सरकारने घेतली आहे. (India Canada Relations)
(हेही वाचा – IAS Promotion : आचारसंहितेपूर्वी 23 अधिकाऱ्यांना मिळाली बढती)
यामुळे आमच्या उच्चायुक्तांची सुरक्षा धोक्यात येऊ शकते, असे सांगत भारताने कॅनडाविरोधात मोठी कारवाई केली आहे. भारतातील कॅनडाच्या दूतावासातील ६ उच्चायुक्तांना केंद्र सरकारने निलंबित केले आहे. या सहा अधिकाऱ्यांना १९ ऑक्टोबरपर्यंत देश सोडण्यास सांगण्यात आले आहे.
ते सहा अधिकारी कोण?
प्रभारी उच्चायुक्त स्टीव्हर्ट रॉस व्हीलर, उप उच्चायुक्त पॅट्रिक हेबर्ट, फर्स्ट सेक्रेटरी मॅरी कॅथरीन जॉली, फर्स्ट सेक्रेटरी लॅन रॉस डेव्हिड ट्रायइट्स, फर्स्ट सेक्रेटरी एडम जेम्स, फर्स्टे सेक्रेटरी पाऊल ओरज्युअला यांची भारतातून हकालपट्टी करण्यात आली आहे. (India Canada Relations)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community