महाराष्ट्रात एका टप्प्यात विधानसभा निवडणुक होणार आहे. दि. १५ ऑक्टोबर रोजी मुख्य निवडणुक आयुक्त राजीव कुमार यांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीची तारीख जाहिर केली. महाराष्ट्रात दि. २० नोव्हेंबरला मतदान होणार असून दि. २३ नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे. ( Election Commission )
महाराष्ट्रात ३६ जिल्ह्यातील विधानसभांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहिर झाला आहे. दि. २६ नोव्हेंबर रोजी विधानसभेचा कार्यकाळ संपत असून विधानसभा निवडणूकीकडे सर्वांना वेध लागले होते. मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी विधानसभा निवडणूकीचा कार्यक्रम जाहिर केला आहे. उमेदवारांना २९ ऑक्टोबर पर्यंत अर्ज भरता येणार आहे. त्यानंतर दि. ३० ऑक्टोबर रोजी अर्जाची छाननी होणार आहे. तसेच उमेदवारांना दि. ४ नोव्हेबरपर्यंत अर्ज मागे घेता येतील. त्याचबरोबर दि. २० नोव्हेंबरला मतदान होणार असून दि. २३ नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे. दरम्यान नांदेड लोकसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक ही दि. २० नोव्हेंबर रोजी होणार आहे.
हेही पाहा :
Join Our WhatsApp Community