महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचे (Maharashtra Assembly Election) बिगुल वाजले आहे, केंद्रीय निवडणूक आयोगाने निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर केले. यंदाच्या निवडणुकीत २० लाख ९३ हजार नवीन मतदार असणार आहे. तर महिला मतदार ४ कोटी ६६ लाख आहेत. त्यामुळे या निवडणुकीत महिला मतदारांची मते निर्णायक ठरणार आहेत. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची यशस्वीता या निवडणुकीत परिणामकारक ठरण्याची शक्यता आहे.
असे असेल महाराष्ट्राच्या निवडणुकीचे वेळापत्रक
- निवडणुकीचं नोटिफिकेशन : 22 ऑक्टोबर 2024
- अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख : 29 ऑक्टोबर
- अर्जांची तपासणी : 30 ऑक्टोबर 2024
- अर्ज मागं घेण्याची तारीख : 4 नोव्हेंबर
- मतदान : 20 नोव्हेंबर 2024
- मतमोजणी : 23 नोव्हेंबर 2024
(हेही वाचा Election Commission : निवडणूक आयोगाकडून ‘ईव्हीएम’बाबत मोठा खुलासा)
288 जागांसाठी किती मतदार असतील?
- एकूण मतदार – 9 कोटी 63 लाख
- नव मतदार – 20.93 लाख
- पुरूष मतदार – 4.97 कोटी
- महिला मतदार – 4.66 कोटी
- युवा मतदार – 1.85 कोटी
- तृतीयपंथी मतदार – 56 हजारांहून जास्त
- 85 वर्षावरील मतदार – 12. 48 लाख
- शंभरी ओलांडलेले मतदार – 49 हजारांहून जास्त
- दिव्यांग मतदार – 6.32 लाख
महाराष्ट्रात किती मतदान केंद्र असणार?
- एकूण मतदान केंद्र – 1 लाख 186
- शहरी मतदार केंद्र – 42,604
- ग्रामीन मतदार केंद्र – 57,582
- महिला अधिकाऱ्यांची केंद्रे –
- एका मतदान केंद्रावर सरासरी मतदार – 960
Join Our WhatsApp Community