सहारनपुर जिल्ह्याच्या नकुड परिसरात लव्ह जिहाद एक धक्कादायक प्रकरण उघडकीस आले आहे. याप्रकरणात मोहम्मद आसिफ (Mohammad Asif) नावाच्या एका तरुणाने हिंदू युवतीला आपल्या जाळ्यात ओढले. सुरुवातीला आसिफने आपली ओळख आशिष असल्याचे पीडित तरुणीला सांगितले. आसिफने धर्मांतर करण्यासाठीही पीडितेवर दबाव टाकला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आसिफने (Mohammad Asif) स्वत:ची ओळख आशिष सांगत, पीडितेवर अत्याचार केला. तसेच आक्षेपार्ह व्हिडिओ तयार करत पीडितेला ब्लॅकमेल करायला सुरुवात केली आहे. (Love Jihad)
(हेही वाचा : Lonavala Railway Station : लोणावळ्यासाठी सर्वात जवळचे रेल्वे जंक्शन कोणते आहे?)
पीडितेने सांगितले की, आसिफ (Mohammad Asif) सहारनपुर जिल्ह्याच्या नकुड परिसरात मोहल्ला जोगियान येथील रहिवाशी आहे. त्याने आठ महिन्यापूर्वी पीडित तरुणीशी संपर्क करत तिला प्रेमाच्या जाळ्यात अडकवले. तरुणीला सांगितले की, स्वत:चे नाव आशिष आहे. मात्र त्याचे खरे नाव आसिफ (Mohammad Asif)असे होते. त्यानंतर आक्षेपार्ह व्हिडिओ तयार करत पीडितेला ब्लॅकमेल करण्याचे काम ही आसिफने केले. त्याचबरोबर आसिफ आणि मोहसिन या दोघांनी मिळून पीडितेवर धर्मांतरासाठी दबाव टाकला. तसेच या दोघांनी पीडितेला मलिक कम्प्यूटर सेंटरमध्ये मारहाण ही केली. (Love Jihad)
पीडितेने दिलेल्या माहितीनुसार, मलिक कम्प्यूटर सेंटर मोहसिन चालवत असे. तसेच कम्प्यूटर सेंटरमध्ये प्रशिक्षणासाठी येणाऱ्या मुलांना मोहसिन आणि आसिफ शिकार बनवत. हिंदू मुलांना प्रेमाच्या जाळ्यात अडकवत लव्ह जिहाद घडवून आणत. पोलिसांनी पीडितेची तक्रार दाखल केली आहे. आसिफ (Mohammad Asif) आणि मोहसिनच्या (Mohsin) विरोधात कारवाई केली आहे. पोलिस संपूर्ण प्रकरणाची चौकशी करत असून आरोपींना लवकरच अटक केली जाईल, अशा विश्वास स्थानिक पोलिस अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. (Love Jihad)
हेही पाहा :
Join Our WhatsApp Community