महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा (Maharashtra Assembly Election) कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाकडून केलेल्या मागणीवर निवडणूक आयोगाने स्पष्टीकरण दिले. शरद पवार गटाकडून पिपाणी चिन्ह गोठवण्याची मागणी निवडणूक आयोगाकडे करण्यात आली होती. मात्र ही मागणी आयोगाने फेटाळली. हा शरद पवार गटाला मोठा धक्का मानला जात आहे. कारण लोकसभा निवडणुकीत तुतारी आणि पिपाणी या चिन्हांमुळे मोठा गोंधळ झाला होता.
अजित पवार यांनी बंड केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे घड्याळ हे चिन्ह त्यांच्याकडे गेले. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला निवडणूक आयोगाने तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह दिले आहे. मात्र लोकसभा निवडणुकीत तुतारी आणि पिपाणी ही चिन्हे सारखीच दिसत असल्यामुळे मोठा गोंधळ झाला होता. चिन्हांच्या साम्यामुळे अनेकांनी तुतारीऐवजी पिपाणीचे बटण दाबले, असे म्हटले जात आहे. त्यामुळे या निवडणूक चिन्हाबाबत शरद पवार गटाने निवडणूक आयोगाने दोन विनंती केल्या होत्या. त्याची नोंद निवडणूक आयोगाने घेतली आहे. (Maharashtra Assembly Election)
(हेही वाचा Love Jihad : हिंदू तरुणी ठरली आसिफच्या वासनेची शिकार; धर्मांतरासाठी आसिफ आणि मोहसिनचा दबाव)
काय म्हणाले निवडणूक आयोग?
तुतारी वाजवणारा माणूस चिन्ह योग्य नाही. ते मतपत्रिकेवर छोटे दिसते. ते मोठे करण्याची पहिली विनंती केली होती. तसेच तुतारी सारखे दिसणारे दुसरे चिन्ह हटविण्यात यावे, ही दुसरी विनंती केली होती. यावर निवडणूक आयुक्त राजीव कुमार म्हणाले की, आम्ही त्यांची पहिली विनंती मान्य केली असून त्याची योग्य दखल घेतली आहे. त्यांना तुतारी चिन्ह कसे दिसले पाहिजे याबाबत आम्ही त्यांना विचारणा केली असता, त्यांनी उत्तर देऊन आकार दिला. त्यांनी दिलेल्या आकारातील पहिला आकार आम्ही मान्य केला आहे, असे ते म्हणाले. दुसरे चिन्ह पिपाणी हे सेम नाही. असे आम्ही त्यांना सांगितले आहे, असेही आयुक्त राजीव कुमार यांनी यावेळी स्पष्ट केले. लोकसभा निवडणुकीनंतर आता राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाला तुतारी सारख्या दिसणाऱ्या पिपाणी चिन्हाचा सामना करावा लागणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
सातारा लोकसभा मतदारसंघात पिपाणीने घेतली 37 हजार मते
सातारा लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून शशिकांत शिंदे हे उभे होते. त्यांची भाजपचे उमेदवार उदयनराजे भोसले यांच्याशी थेट लढत होती. या निवडणुकीत शशिकांत शिंदे यांचा 32 हजार 770 मतांनी पराभव झाला होता. पिपाणी चिन्ह भेटलेल्या संजय गाडे या अपक्ष उमेदवाराला 37 हजार 62 इतकी मते मिळाली. मोहन रायकवर 20 हजार 795 मते घेऊन तिसऱ्या क्रमांकावर राहिले.
Join Our WhatsApp Community