अल्ट्राटेक सिमेंट लिमिटेड ही मुंबई स्थित एक भारतीय सिमेंट कंपनी आहे आणि ती आदित्य बिर्ला समूहाचा एक भाग आहे. अल्ट्राटेक ही भारतातील ग्रे सिमेंट, रेडी-मिक्स कॉंक्रिट आणि पांढऱ्या सिमेंटची सर्वात मोठी उत्पादक कंपनी आहे ज्याची स्थापित क्षमता प्रतिवर्ष ११६.७५ दशलक्ष टन आहे. (UltraTech Cement)
( हेही वाचा : Mukhyamantri Teerth Darshan Yojana मध्ये आणखी ११० तीर्थ क्षेत्रांचा समावेश)
आदित्य बिर्ला समूहाच्या मालकीच्या अल्ट्राटेक सिमेंटच्या (UltraTech Cement) बोर्डाने इंडिया सिमेंटमधील प्रवर्तक आणि त्यांच्या सहयोगी यांच्याकडून ३२.७२% इक्विटी स्टेक घेण्यास मान्यता दिली आहे. अल्ट्राटेकने (UltraTech Cement) जून २०२४ मध्ये २२.७७% भागभांडवल रुपये २६८ प्रति शेअर या दराने खरेदी करण्यासाठी यापूर्वी इंडिया सिमेंटमध्ये गुंतवणूक केली होती. तसेच विवेक अग्रवाल अल्ट्राटेक सिमेंटमध्ये पूर्णवेळ संचालक आणि मुख्य विपणन अधिकारी आहेत. त्याचबरोबर अनूप खत्री हे अल्ट्राटेक सिमेंट लिमिटेडचे मुख्य कायदेशीर अधिकारी आहेत. (UltraTech Cement)
हेही पाहा :
Join Our WhatsApp Community