Uddhav Thackeray यांच्यामुळे शिवस्मारक रखडले; समाजमाध्यमांवर व्हिडिओ व्हायरल

386
Uddhav Thackeray यांच्यामुळे शिवस्मारक रखडले; समाजमाध्यमांवर व्हिडिओ व्हायरल
  • खास प्रतिनिधी 

अरबी समुद्रातील छत्रपती शिवाजी महाराजांचे जागतिक दर्जाचे स्मारक कुणामुळे रखडले? शिवस्मारकाचे काम सुरू करण्यासाठी सर्व यंत्रणा किनाऱ्यावर सज्ज झाली असताना न्यायालयात जाऊन कामाला स्थगिती आणणारे कोण होते? यामागचे सूत्रधार कोण? यासंदर्भात एक व्हिडिओ समाजमाध्यमांवर प्रचंड व्हायरल होत आहे.

महत्वाकांक्षी प्रकल्प

महाराष्ट्राच्यादृष्टीने अत्यंत महत्वाकांक्षी प्रकल्प सुरू होण्यापूर्वीच कामात खोडा घालण्यासाठी महाविकास आघाडी कशी कामाला लागली होती आणि त्यांनी काय काय केले? याबाबची एक व्हिडिओ क्लिप समाज माध्यमांवर प्रचंड व्हायरल होत असून त्यात तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि त्यांच्या पक्षाचे नेते दामोदर तांडेल, वकील असीम सरोदे तसेच शरद पवार यांना दोषी मानले आहे.

(हेही वाचा – Maharashtra Assembly election मध्ये प्रथमच सहा राजकीय पक्ष उतरणार निवडणूक रिंगणात)

फडणवीस यांच्याकडून पाठपुरावा

शिवस्मारकाची घोषणा तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी यांनी केली आणि १९९९ ला शिवसेना-भाजपा सरकार जाऊन काँग्रेस-राष्ट्रवादी सरकार आले. त्यानंतर या प्रकल्पाचा पुढे पाठपुरावा झाला नाही. अगदी २०१४ मध्ये देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होईपर्यंत शिवसमारकाची फाइल धूळ खात मंत्रालयात पडून होती. फडणवीस यांनी पदभार स्वीकारल्यानंतर दोन वर्षातच बहुतांश परवानग्या घेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते डिसेंबर २०१६ मध्ये अरबी समुद्रात शिवस्मारकाच्या कामाचे जलपूजन केले. कामाचे कार्यादेश काढले, एका नामांकित कंपनीने कामाचे सामान अरबी समुद्राच्या किनाऱ्यावर आणून ठेवले.

महाविकास आघाडी शिवस्मारकाविरोधात

त्यानंतर एकेकाळचे शरद पवार समर्थक आणि कोळी समाजाचे नेते दिवंगत दामोदर तांडेल यांना उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या पक्षात घेतले आणि त्यानंतर तांडेल यांनी या प्रकल्पाला विरोध करायला सुरुवात केली तसेच न्यायालयातही धाव घेतली. केस न्यायालयात लढली ती असीम सरोदे यांनी, जे शिवसेना बंडानंतर ‘शिवसेना कोणाची’ या प्रकरणात उबाठा यांचे एक वकील म्हणून काम पाहिले. इतकेच नाही तर खासदार सुप्रिया सुळे यांच्यासोबत देबी गोएंका यांचा एक फोटो शेअर करत गोएंका यांनीही न्यायालयात केस दाखल करीत शिवस्मारकाला विरोध केला. अखेर न्यायालयाने प्रकल्पाला स्थगिती दिली. त्यामुळे एकेकाळचे पवार समर्थक तांडेल यांनी मासेमारीचे कारण देत विरोध केला आणि देबी गोएंका यांनी प्रकल्प पर्यावरणविरोधी आहे असे कारण देत विरोध दर्शवला. एकूण काय तर महाविकास आघाडीने शिवस्मारक प्रकल्प होऊ नये म्हणून कंबर कसली. थोडक्यात शिवस्मारकाचे काम रखडवणारे उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि या शिवस्मारकाचे काय झाले? हे विचारणारेही उद्धव ठाकरेच, असे या व्हिडिओत क्लिपमध्ये म्हटले आहे.

(हेही वाचा – Governor नियुक्त आमदार प्रकरणी महायुतीकडून महाविकास आघाडीवर कुरघोडी)

उद्धव ठाकरे यांना दुतोंडी साप

यापुढे जात उद्धव ठाकरे यांना ‘दुतोंडी साप’ अशी उपमा देऊन ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी कोणत्या विषयांवर भूमिका बदलली आणि कोणाती कामे धुळीस मिळवली याची जंत्रीच या व्हिडिओमध्ये दिली. “पालघर साधू हत्याकांड, स्वातंत्र्यवीर सावरकर, राम मंदिर, कलम ३७० रद्द करणे, अरबी समुद्रातील अनधिकृत मजार, औरंग्याची कंबर, याकुब मेमनची कबर अशा अनेक मुडद्यांवर भूमिका बदलली. तसेच मराठा आरक्षण रद्द झाले, ओबीसी आरक्षण गेले, शिवसमारक होऊ नये म्हणून प्रयत्न केले ते उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) मुख्यमंत्री असताना. इतकंच काय तर स्वतःच्या वडिलांचे स्मारक बांधू शकले नाहीत,” असे सांगत “उद्धव ठाकरे यांनी जणाची नाही तर मनाची लाज बाळगावी,” असा सल्ला दिला.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.