Clerk Recruitment : महापालिकेत १८४६ कार्यकारी सहायक पदांच्या जागांसाठी १,११,३५८ अर्ज

756
Clerk Recruitment : महापालिकेत १८४६ कार्यकारी सहायक पदांच्या जागांसाठी १,११,३५८ अर्ज
  • विशेष प्रतिनिधी, मुंबई

बृहन्मुंबई महानगरपालिकेमध्ये कार्यकारी सहायक (लिपिक) पदाच्या १ हजार ८४६ जागांसाठी राबवलेल्या भरती प्रक्रियेत तब्बल १ लाख ११ हजार ३५८ उमेदवारांनी अर्ज भरले आहे. प्रत्यक्षात या पदांसाठी एकूण २ लाख ६ हजार ५८२ उमेदवारांनी अर्जांची नोंदणी केली होती. त्यातील १ लाख ११ हजार ३५८ उमेदवारांनी शुल्क भरुन प्रत्यक्षात भरती प्रक्रियेत भाग घेतला आहे. (Clerk Recruitment)

(हेही वाचा – Governor नियुक्त आमदार प्रकरणी महायुतीकडून महाविकास आघाडीवर कुरघोडी)

मुंबई महानगरपालिकेत ‘कार्यकारी सहायक’ (पूर्वीचे पदनाम: लिपिक) संवर्गातील रिक्त पदे सरळसेवेने भरण्यासाठी २० ऑगस्ट २०२४ पासून ऑनलाईन अर्ज भरती प्रक्रिया सुरु करण्यात आली होती. या भरतीसाठी ‘माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा (दहावी) व पदवी परीक्षेत प्रथम प्रयत्नात उत्तीर्ण’ ही शैक्षणिक अर्हता लागू होती. परंतु, त्यातील ‘प्रथम प्रयत्नात’ ही अट रद्द करण्याची सूचना व मागणी विविध स्तरांवरुन करण्यात आली होती. त्यावर सकारात्मक निर्णय घेत, मुंबई महानगरपालिका प्रशासनाने ‘प्रथम प्रयत्नात’ ही अट रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. पर्यायाने आता नव्याने जाहिरात प्रसिद्ध करुन येत्या पंधरा दिवसांच्या आत भरती प्रक्रिया पुन्हा सुरु करण्यात आला. त्यासाठी २० ऑगस्ट २०२४ ते ९ सप्टेंबर २०२४ या कालावधीत आणि अर्हता शिथील केल्यानंतर सुधारित जाहिरातीनुसार २१ सप्टेंबर २०२४ ते ११ ऑक्टोबर २०२४ या कालावधीत ऑनलाईन अर्ज मागवण्यात आले होते. (Clerk Recruitment)

(हेही वाचा – Baba Siddique Death : कशी आहे मुंबई आणि महाराष्ट्रातील झोपडपट्टी पुनर्वसन बाजारपेठ? एसआरएमध्ये किती व्यावसायिक आहेत?)

त्यानुसार, ९ सप्टेंबर २०२४ पर्यंत एकूण १ लाख ५७ हजार ६३८ उमेदवारांनी अर्ज केले. पैकी ७३ हजार ९१८ उमेदवारांनी परीक्षा शुल्क भरले आहे. तर, सुधारित जाहिरातीनुसार ११ ऑक्टोबर २०२४ पर्यंत ४८ हजार ९४४ उमेदवारांनी अर्ज केले. पैकी ३७ हजार ४४० उमेदवारांनी परीक्षा शुल्क भरलेले आहे. त्यामुळे दोन्ही टप्प्यांत मिळून एकूण २ लाख ६ हजार ५८२ अर्ज प्राप्त झाले. त्यापैकी परीक्षा शुल्क भरून अर्ज केलेल्या उमेदवारांची संख्या एकूण १ लाख ११ हजार ३५८ एवढी असल्याचे प्रशासनाने स्पष्ट जाहीर केले आहे. त्यामुळे एका जागेसाठी ६० जणांमध्ये स्पर्धा असल्याचे दिसून येत आहे. (Clerk Recruitment)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.