वांद्रे पश्चिम येथील माजी आमदार आणि राज्यमंत्री बाबा सिद्दीकी (Baba Siddiqu) यांच्यावर गोळ्या झाडणाऱ्या हल्लेखोरानी गांजाची नशा केली होती, असा संशय पोलिसांकडून व्यक्त करण्यात येत आहे, कारण त्यांच्या कुर्ला येथील भाड्याच्या घरात गांजा सदृश्य पदार्थ असलेली छोटी पुडी मिळून आली आहे.
या हल्लेखोराना गांजा सप्लाय करणाऱ्याचा कसून शोध घेण्यात येत असल्याची माहिती पोलीस सुत्रांनी दिली आहे.
बाबा सिद्दीकी (Baba Siddiqu) यांची गोळ्या झाडून हत्या करणाऱ्या धर्मराज कश्यप (Dharmaraj Kashyap), गुरमेल सिंग (Gurmail Singh) आणि शिवकुमार गौतम (Shivakumar Gautam) या तिघांना गांजाचे व्यसन होते. हल्ल्याच्या २० दिवसांपूर्वी या तिघांनी कुर्ला पश्चिम विनोबा भावे नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मायकल हायस्कुल जवळ असणाऱ्या पटेल चाळीत भाड्याने एक घेतले होते.
या ठिकाणी तिघे राहत होते, शेजाऱ्यांना त्यांनी कॉल सेंटर मध्ये काम करीत असल्याचे खोटे सांगितले होते, तसेच त्यांच्याकडे एक मोटारसायकल होती, रोज रात्री दोघेजण मोटारसायकलवर रेकी करण्यासाठी वांद्रे पूर्व आणि पश्चिम परिसरात निघत होते अशी माहिती समोर आली आहे. पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार हल्ल्याच्या दिवशी धर्मराज, गुरमेल आणि शिवकुमार या तिघांनी गांजा या अमली पदार्थाचे सेवन केल्याचा संशय आहे, दसऱ्याच्या दिवशी या तिघे गांजाच्या नशेत सायंकाळी भाड्याचे घर सोडले होते, घराशेजारी असलेल्या भुर्जी पावच्या गाडीवर अंडपाव खाल्ला आणि घटनास्थळी दाखल झाले. यावेळी तिघांनी रिक्षाचा वापर केला होता. (Baba Siddiqu)
(हेही वाचा- भारत शक्तीशाली राष्ट्र होण्यामागे RSS चा मोठा वाटा; पुलक सागर महाराजांकडून संघ कार्याचे कौतुक)
पोलीस पथकाने त्याच्या भाड्याच्या घराची झडती घेतली त्यावेळी पोलिसांना गांजाची छोटी पुडी मिळून आली आहे. या तिघांना गांजा पुरवणाऱ्याचा शोध घेण्यात येत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. (Baba Siddiqu)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community