Ind vs NZ, 1st Test : बंगळुरू कसोटीवर पावसाचं सावट, काय आहे हवामानाचा अंदाज 

Ind vs NZ, 1st Test : भारतीय संघाचा सरावाचा वेळही मंगळवारी पावसात वाहून गेला 

191
Ind vs NZ, 2nd Test : भारत वि न्यूझीलंड सामन्यावेळी कसं असेल पुण्यातील हवामान?
Ind vs NZ, 2nd Test : भारत वि न्यूझीलंड सामन्यावेळी कसं असेल पुण्यातील हवामान?
  • ऋजुता लुकतुके 

भारत आणि न्यूझीलंड दरम्यानची पहिली कसोटी बंगळुरू इथं होत आहे. पण, या सामन्यावर वरुण राजाचंच राज्य दिसत आहे. सामना पूर्ण थांबण्याची भीती सध्या नसली तरी पाचही दिवस पावसाचा व्यत्यय येऊ शकतो, अशी चिन्हं आहेत. महत्त्वाचं म्हणजे कसोटीच्या शेवटच्या दोन दिवसांत जास्त पाऊस आहे. पाचही दिवस हवामान ढगाळच असणार आहे. त्यामुळे मैदान झटपट सुकवण्यासाठी मैदानावरील कर्मचाऱ्यांची चांगलीच दमछाक होणार आहे. (Ind vs NZ, 1st Test)

(हेही वाचा- मंदिरे ही अधार्मिक चित्रपटांच्‍या चित्रीकरणाची ठिकाणे नाहीत; Kerala High Court चे निरीक्षण)

‘१६ ते १८ या कालावधीत वातावरण ढगाळ असेल आणि जोरदार पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता आहे. पुढील पाचही दिवस हे पावलाचे आहेत,’ असं स्थानिक हवामान अंदाजात म्हटलं आहे.  (Ind vs NZ, 1st Test)

114234634.jpg

भारतीय संघाने या आधीच्या आपल्या दोन कसोटी जिंकल्या आहेत. आयसीसीच्या कसोटी क्रमवारीत सध्या भारतीय संघ अव्वल स्थानावर आहे. पण, ऑस्ट्रेलियाशी ऑस्ट्रेलियात दोन हात करण्यापूर्वी ही मालिका भारतीय संघासाठी महत्त्वाची आहे. २०१३ पासून भारतीय संघाने सलग १८ देशांतर्गत कसोटी मालिका जिंकल्या आहेत. पण, भारतीय संघाचे प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी खेळाडूंना अतीआत्मविश्वास न बाळगण्याचाच सल्ला दिला आहे. (Ind vs NZ, 1st Test)

‘न्यूझीलंड संघाचा आम्ही आदर करतो. पण, आम्ही त्यांना घाबरत नाही. पहिल्या चेंडूपासून भारतीय खेळाडू आक्रमक खेळ करतील याची ग्वाही मी देतो. आम्ही फक्त आणि फक्त विजयासाठीच प्रयत्न करू. सामन्यात निदान ३-४ दिवासांचा खेळ व्हावा यासाठी इथल्या कर्मचाऱ्यांनी आम्हाला मदत करावी. बाकी आम्ही पहिली फलंदाजी करतो की, गोलंदाजी याने आम्हाला काही फरक पडत नाही,’ असं गंभीर कसोटीपूर्वी पत्रकारांशी बोलताना म्हणाला आहे. (Ind vs NZ, 1st Test)

(हेही वाचा- Governor appointed MLA : राज्यपाल नियुक्त आमदारांवर टांगती तलवार; मात्र उबाठाच्या मागणीला न्यायालयाचा नकार)

भारतीय संघ इथून पुढे आयसीसी अजिंक्यपद स्पर्धेपूर्वी ८ कसोटी सामने खेळणार आहे. न्यूझीलंड विरुद्धच्या मालिकेत भारतीय संघ ३ कसोटी सामने खेळेल. त्यानंतर भारतीय संघ ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर रवाना होईल. ५ कसोटी सामन्यांची ही मालिका असेल. अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना जूनमध्ये लॉर्डर्सवर होणार आहे. (Ind vs NZ, 1st Test)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.