बहुप्रतीक्षित मुंबई मेट्रो ३ (Mumbai Metro Line 3) प्रवाशांच्या सेवत येऊन काहीच दिवस झाले आहेत. या मेट्रो मार्गिकेला प्रवाशांचा उत्तम प्रतिसाद लाभलेला असून, मुंबई मेट्रो प्राधिकरणाने मुंबई मेट्रो-३ सेवेच्या टी-2 स्थानकापासून आंतरराष्ट्रीय विमानतळावर जाणाऱ्या प्रवाशांसाठी मोफत बससेवा (Mumbai airport to Metro station free bus service) सुरू केली. या बसमध्ये प्रवाशांना त्यांचे सामान ठेवण्यासाठी लोडर सुविधाही देण्यात आली. मुंबई मेट्रो रेल्वे प्राधिकरणाच्या (Mumbai Metro Rail Authority) व्यवस्थापकीय संचालक अश्विनी भिडे (Director Ashwini Bhide) यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना याबाबत माहिती दिली. (Mumbai Metro Line 3)\
MMRC introduces a free #bus service along with loader service for baggage for #Metro3 passengers to ease the journey between the Airport (A2 entry, west side) and T2 (P4 entry- pick up and drop) 🚌 The 21-seater bus will run every 15 minutes, from 6:30 AM to 11:00 PM (Mon-Sat)… pic.twitter.com/bY9HiTJ9S1
— MumbaiMetro3 (@MumbaiMetro3) October 15, 2024
प्रवाशांच्या सोयी वाढवण्याच्या दृष्टीने, मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड (MMRC) ने विमानतळ (A2 एंट्री, वेस्ट साइड) आणि टर्मिनल २ (P4 एंट्री) दरम्यान प्रवास करणाऱ्या मेट्रो 3 प्रवाशांसाठी मोफत बस सेवा सुरू केली आहे. मेट्रो स्टेशन आणि विमानतळ टर्मिनल दरम्यान अखंड प्रवास प्रदान करण्याच्या दृष्टीने ही सेवा प्रदान करण्यात येत आहे. २१ आसनी बसेस १५ मिनिटांच्या अंतराने चालतील. दरम्यान, ही सेवा सोमवार ते शनिवार सकाळी ०६:३० ते रात्री ११:००आणि रविवारी सकाळी ८:१५ ते रात्री ११:००पर्यंत उपलब्ध असणार आहे. (Mumbai Metro Line 3)
(हेही वाचा – मंदिरे ही अधार्मिक चित्रपटांच्या चित्रीकरणाची ठिकाणे नाहीत; Kerala High Court चे निरीक्षण)
मेट्रो ३ कॉरिडॉरचा पहिला टप्पा, आरे ते वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स (BKC), पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ५ ऑक्टोबर रोजी उद्घाटन करण्यात आले आणि ७ ऑक्टोबर रोजी नागरिकांसाठी खुले करण्यात आले.
हेही पाहा –
Join Our WhatsApp Community