Mohammed Shami : मोहम्मद शामीची अनुपस्थिती भारतीय संघ कशी भरून काढणार?

Mohammed Shami : कसोटी संघात भारतीय वातावरणात आकाशदीपने शामीची जागा घेतली आहे 

89
Mohammed Shami : मोहम्मद शामीची अनुपस्थिती भारतीय संघ कशी भरून काढणार?
Mohammed Shami : मोहम्मद शामीची अनुपस्थिती भारतीय संघ कशी भरून काढणार?
  • ऋजुता लुकतुके 

जसप्रीत बुमरा (Jasprit Bumrah), मोहम्मद शामी (Mohammed Shami) आणि मोहम्मद सिराज हे भारताचं सध्याचं सर्वोत्तम तेज त्रिकुट आहे. पण, या त्रयीचा जलवा शेवटी नोव्हेंबर २०२३ मध्ये दिसला होता. त्यानंतर मोहम्मद शामी पायाच्या दुखापतीमुळे संघाबाहेर आहे. दुखापतीतून बाहेर येण्यासाठी त्याला वेळही लागतोय. एप्रिल महिन्यात त्याने परदेशात जाऊन शस्त्रक्रियाही करून घेतली. बंगळुरूमध्ये तो सध्या क्रिकेट अकादमीत सराव करत आहे. पण, न्यूझीलंड विरुद्ध तो खेळेल ही अपेक्षा फोल ठरली आहे.

(हेही वाचा- Vidhansabha Election 2024 : महायुतीच्या जागावाटपावर शिक्कामोर्तब.. अधिकृत घोषणा दिल्लीतून….!)

भारतीय कर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma) बंगळुरूत पत्रकारांना स्पष्टपणे सांगितलं की, ‘शामीच्या गुडघ्याला सूज येतेय.’ खरंतर गेल्याच आठवड्यात शामीने या बातमीचं खंडन केलं होतं. पण, रोहीतनेच आता बातमीला दुजोरा दिल्यामुळे शामीच्या दुखापतीविषयी गोंधळ आणखी वाढला आहे. ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या मालिकेला आता फक्त एक महिना आहे. त्यापूर्वी तरी तो तंदुरुस्त होईल का हा प्रश्न आहे. स्विंग गोलंदाजीत शामी भारतात अव्वल आहे. त्याची गरज खासकरून ऑस्ट्रेलियात भारताला आहेच. पण, तो ऑस्ट्रेलियात तरी संघाबरोबर असेल का या प्रश्नावरही रोहितने मौन बाळगलं आहे. ‘आताच काही सांगणं कठीण आहे,’ इतकंच रोहीत म्हणाला. (Mohammed Shami)

अशावेळी आता उपलब्ध गोलंदाजांमधून तिसरा नवीन गोलंदाज तयार कऱणं एवढंच भारतीय प्रशासनाच्या हातात आहे. त्या दृष्टीने भारतासमोर काय पर्याय आहेत ते बघूया. आधीच्या मालिकेत घरच्या मैदानावरही भारतीय संघाने ३ तेज गोलंदाज खेळवणं पसंत केलं. चेन्नई आणि कानपूरची खेळपट्टी त्यासाठी कारणीभूत होती. पण, बुमरा आणि सिराजसह आकाशदीपला संधी मिळाली. ती त्याने दोन्ही हातांनी घेतली.  (Mohammed Shami)

(हेही वाचा- Sangli Pattern विदर्भात काँग्रेससाठी पुन्हा होणार का?)

शामी जरी खेळला तरी ४ गोलंदाजांच्या ताफ्यात आकाशदीप संघाचे दरवाजे नक्कीच ठोठावत आहे. ज्या ३ कसोटी खेळण्याची संधी आकाशदीपला मिळाली त्यातील त्याची कामगिरी पाहूया, (Mohammed Shami)

३/८३ वि. इंग्लंड (रांची) 

२/३९ वि. बांगलादेश (चेन्नई)

३/६३ वि. बांगलादेश (कानपूर)

२७ वर्षीय आकाशदीप फेब्रुवारीत आपली पहिली कसोटी खेळला. यात त्याने सातत्यपूर्ण कामगिरी केली आहे. चेंडूला योग्य दिशा आणि टप्पा देण्यातही तो यशस्वी ठरला आहे. (Mohammed Shami)

 बंगळुरूची खेळपट्टी पारंपरिकदृष्ट्या तेज गोलंदाजांना चांगली साथ देते. त्यामुळे ही कसोटीही तो खेळण्याची शक्यता आहे. आणि ऑस्ट्रेलिया दौऱ्यावरही तो असेल. आणखी एक खेळाडू ज्याचा ऑस्ट्रेलिया दौरा जवळ जवळ निश्चित आहे तो आहे मोहम्मद सिराज. महत्त्वाचं म्हणजे चार वर्षांपूर्वी ऑस्ट्रेलिया विरुद्धच सिराजने कसोटीत पदार्पण केलं होतं. पहिल्याच कसोटीत मेलबर्न इथं त्याने डावांत ५ बळी मिळवले होते. एकदिवसीय विश्वचषकातही त्याची कामगिरी अव्वल होती. पण, २०२४ मध्ये त्याची कामगिरीत सातत्याचा अभाव दिसतो आहे. २०२४ मध्ये ७ कसोटींत त्याने १७ बळी मिळवले आहेत. यातील ७ बळी तर दक्षिण आफ्रिकेतील केपटाऊन कसोटीतीली आहेत. तिथे खेळपट्टीची मदत त्याला मिळाली होती. (Mohammed Shami)

(हेही वाचा- विधानसभेच्या जागा वाटपाबाबत Chandrakant Bawankule यांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना सूचक इशारा, म्हणाले…)

बुमरा, सिराज आणि आकाशदीप हे कसोटीत संघात आता स्थिरावलेत. बुमरा गोलंदाजांचं नेतृत्व करत आहे. आता राखीव फळीकडे वळूया. रोहीतने ऑस्ट्रेलियातही राखीव खेळाडूंना घेऊन जाण्याचा निर्णय जाहीर केला आहे. यातही लक्ष असेल ते मयांक यादवकडे. ताशी १५६ किमी वेगाने गोलंदाजी करू शकणारा हा युवा गोलंदाज भारतीय गोलंदाजीचं भविष्य ठरू शकतो. त्यामुळे त्याला घडवणं ही मोठी जबाबदारी आहे.  (Mohammed Shami)

 मयंक यादव (Mayank Yadav), प्रसिद्ध कृष्णा (Prasidh Krishna) आणि हर्षित राणा (Harshit Rana) हे राखीव खेळाडू सध्या संघाबरोबर आहेत. त्याचबरोबर यश दयालही संघाचे दरवाजे ठोठावतो आहे. ऑस्ट्रेलियातील खेळपट्टी ही तेज गोलंदाजीला साथ देणारी असणार हे नक्की आहे. ते पाहता या तिघांपैकी किमान एकाला थेट भारतीय संघातही स्थान मिळू शकतं. बाकी राखीव खेळाडू म्हणून ते संघाबरोबर असतीलच. (Mohammed Shami)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.