राखीव खेळाडूंना ऑस्ट्रेलिया मध्ये घेऊन जाण्याचा विचार – Rohit Sharma

Rohit Sharma : सध्याच्या राखीव खेळाडूंपैकी किमान एकाचा संघातही समावेश होऊ शकतो 

169
राखीव खेळाडूंना ऑस्ट्रेलिया मध्ये घेऊन जाण्याचा विचार - Rohit Sharma
राखीव खेळाडूंना ऑस्ट्रेलिया मध्ये घेऊन जाण्याचा विचार - Rohit Sharma
  • ऋजुता लुकतुके 

भारतीय संघ न्यूझीलंड विरुद्धच्या मालिकेची तयारी सध्या करत आहे. संघाचं पुढील उद्दिष्ट ऑस्ट्रेलिया दौरा असेल हे नक्की आहे. न्यूझीलंड विरुद्धची मालिका भारताला जिंकायची आहेच. पण, त्याशिवाय संघासमोर उद्दिष्टं आहे ते संघाबरोबर असलेल्या राखीव खेळाडूंना म्हणजेच नवख्या खेळाडूंना तयार करण्याचं. बंगळुरूत पत्रकारांशी बोलताना रोहितनेही याच गोष्टीला महत्त्व दिलं. ऑस्ट्रेलियाचा दौरा नेहमीच खडतर असतो. यंदा ५ कसोटी संघाला खेळायच्या आहेत. अशावेळी मुख्य संघाला राखीव खेळाडूंचा आधार हवाच. तोच विचार भारतीय संघ करत आहे. (Rohit Sharma)

(हेही वाचा- महिला आयोगाच्या अध्यक्षपदी पुन्हा Rupali Chakankar यांची नियुक्ती)

‘मयांकने आपली गुणवत्ता दाखवून दिली आहे. त्याच्या कौशल्याविषयी शंका घेण्याचं कारण नाही. पण, भविष्याचा विचार करता थोडं सावधच राहावं लागेल. त्याला दुखापतींनी खूप त्रास दिला आहे. त्यामुळे त्याच्यावर लगेच मोठी जबाबदारी टाकण्यापेक्षा त्याला आम्ही वेळ देऊ. त्याच्यावर मेहनत घेऊ. लक्ष ठेवू. आणि मग त्याला योग्य वेळ आल्यावर नियमित संघात घेऊ,’ असं रोहित मयांकविषयी बोलताना म्हणाला. (Rohit Sharma)

हर्षित राणा (Harshit Rana), नितेश रेड्डी (Nitesh Reddy) आणि मयंक यादव (Mayank Yadav) हे राखीव खेळाडू सध्या संघाबरोबर आहेत. त्यांच्याकडे भविष्यातील तेज गोलंदाज म्हणून पाहिलं जात आहे हे उघड आहे. ऑस्ट्रेलियातही त्यांना सोबत घेण्याचीच भारताची रणनीती दिसत आहे. ‘या खेळाडूंकडे गुणवत्ता आहे. देशांतर्गत क्रिकेटमध्येही कसोटी खेळण्याचा फारसा अनुभव त्यांच्याकडे नाही. पण, त्यांच्यावर मेहनत घेतली तर ते तयार होऊ शकतात. ते संघाबरोबरच असतील तर त्यांनाही फायदा होईल. संघासाठीही ते लवकर उपलब्ध होऊ शकतील. त्यांना लवकरात लवकर तयार करणं हेच आमचं उद्दिष्टं आहे. ऑस्ट्रेलियातही त्यांना बरोबर घेऊन जाण्याचा आमचा विचार आहे,’ असं रोहितने मंगळवारी स्पष्ट केलं आहे. (Rohit Sharma)

(हेही वाचा- Vidhansabha Election 2024 : महायुतीच्या जागावाटपावर शिक्कामोर्तब.. अधिकृत घोषणा दिल्लीतून….!)

मयंक यादव आणि नितिश रेड्डी अलीकडेच भारतासाठी टी-२० सामने खेळले आहेत. (Rohit Sharma)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.