केंद्रीय निवडणुक आयोगाचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार (Rajiv Kumar) हे प्रवास करत असलेल्या हेलिकॉप्टरचे दि. १६ ऑक्टोबर रोजी इर्मजन्सी लँडिंग करण्यात आला आहे. उत्तराखंडच्या मुन्सियारी येथे हे इर्मजन्सी लँडिंग करण्यात आले आहे. या हेलिकॉप्टरमध्ये मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार (Rajiv Kumar) यांच्यासह उत्तराखंडचे अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी विजय कुमार जोगदंड हेही होते. पिथौरागढ जिल्ह्यात हे इर्मजन्सी लँडिंग करण्यात आले असून सर्वजण सुरक्षित असल्याची माहिती उत्तराखंड सरकारने दिली आहे. (Election Commission)
(हेही वाचा : मशिदीत जय श्रीराम म्हटल्याने धार्मिक भावना दुखावत नाहीत; Karnataka High Court चा निर्वाळा)
दरम्यान महाराष्ट्रात एका टप्प्यात विधानसभा निवडणुक होणार आहे. दि. १५ ऑक्टोबर रोजी मुख्य निवडणुक आयुक्त राजीव कुमार यांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीची तारीख जाहिर केली. महाराष्ट्रात दि. २० नोव्हेंबरला मतदान होणार असून दि. २३ नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे. (Election Commission)
हेही पाहा :
Join Our WhatsApp Community