आता सरकार पाडायला रणगाडे घुसवा, सैन्य पाठवा!

कितीही आरडाओरडा केला, कितीही संशयाचे वातावरण तयार केले, तरीही विरोधी पक्षाला या विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीत यश मिळणार नाही. विरोधकांनी समंजस्याने भूमिका घ्यायला हवी होती, असा चिमटा संजय राऊत यांनी काढला.

116

सरकार पाडण्यासाठी तपास यंत्रणांचा वापर केला जात आहे, हे अत्यंत दुर्दैवी आहे. ईडी आणि सीबीआय यांच्या माध्यामातून पाठीत वर केला जात आहे. आता सरकार पाडण्यासाठी रणगाडे घुसवा, सैन्य तैनात करा, असा खोचक टोला शिवसेना नेते संजय राऊत यांनी मारला.

किती आदळआपट केली तरी विजय आमचाच!

विधानसभा अध्यक्षपदावरील व्यक्तीला प्रदेशाध्यक्षपदी निवड केल्याने ते पद रिक्त झाले, कोरोनाचा संसर्ग सुरु आहे, अशा वेळी तिन्ही पक्षांच्या आमदारांना एकत्र करुन निवडणूक घेणे हे सद्यस्थितीत टाळायला हवे, ते योग्यच होते. मात्र आता निवडणूक आहे, तिन्ही पक्ष निर्णय घेतील. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आमदार येणार आहेत. त्यांची टेस्ट केल्याशिवाय प्रवेश मिळणार नाही. अशा परिस्थितीत एखादा आमदार बाहेर राहिला तर निवडणुकीवर परिणाम होऊ शकतो, अशा वेळी त्या निवडणुकीला काही अर्थ उरत नाही, असेही राऊत म्हणाले. कोणी कितीही आपटली तरी विजय हा महाविकास आघाडीच्या उमेदवाराचाच होणार. विरोधकांनी निवडणूक टाळली तर महाराष्ट्रावर उपकार होतील. जिंकणार तर आम्हीच, कितीही आरडाओरडा केला, कितीही संशयाचे वातावरण तयार केले, तरीही विरोधी पक्षाला या विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीत यश मिळणार नाही. विरोधकांनी समंजस्याने भूमिका घ्यायला हवी होती, असा चिमटा संजय राऊत यांनी काढला.

(हेही  वाचा : आता जबाबदारी केंद्राची, मराठा आरक्षण द्यायचे कि नाही स्पष्ट करावे!)

सत्तेसाठी तपास यंत्रणेचा वापर!

जे सत्ता स्थापन करण्यात किंवा सत्तेत महत्त्वाच्या भूमिका बजावत आहेत. त्यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यांच्यावर कारवाया केल्या जातात. एका कारखान्यावर लाखों लोकांची जीवन अवलंबून आहे. कारवाई करण्याची धमकी दिली जातेय. हे निर्मळ राजकारण नाही. आमने सामने लढाई करावी. ही महाराष्ट्राची परंपरा नाही. ईडी, सीबीआयचा हा वापर हा तर पाठीतला वार आहे. मी कोणत्याही पक्षाचे नाव घेणार नाही. पण राज्याला हे शोभा देत नाही, असेही ते म्हणाले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.