S. Jaishankar यांनी पाकिस्तानला सुनावले खडेबोल; म्हणाले, दहशतवाद आणि व्यापार…

175
S. Jaishankar यांनी पाकिस्तानला सुनावले खडेबोल; म्हणाले, दहशतवाद आणि व्यापार...
S. Jaishankar यांनी पाकिस्तानला सुनावले खडेबोल; म्हणाले, दहशतवाद आणि व्यापार...

शंघाई सहयोग संघटना (SCO) मध्ये सहभागी होण्यासाठी इस्लामाबाद येथे पोहचलेले भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी पाकिस्तान आणि चीनची खरडपट्टी काढली आहे. बैठकीला संबोधित करताना जयशंकर यांनी पाकिस्तान-चीनच्या चीन-पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर (CPEC) प्रकल्पामुळे झालेल्या सार्वभौमत्वाच्या उल्लंघनाचा मुद्दा उपस्थित केला. त्यामुळे दहशतवाद आणि व्यापार एकत्र होऊ शकत नाही, असे खडेबोल जयशंकर (S. Jaishankar) यांनी पाकिस्तानला सुनावले.

( हेही वाचा : Blinkit 10 Minute Return : ब्लिंकिटचं नवीन १० मिनिटात रिटर्न धोरण काय आहे?

चीन आणि पाकिस्तानचे नाव न घेता परराष्ट्र मंत्री (S. Jaishankar) म्हणाले की, सर्व देशांनी एकमेकांच्या सीमांचा आदर करणे आवश्यक आहे. तत्पूर्वी, एससीओ बैठकीचे उद्घाटन करताना पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ म्हणाले की, पाकिस्तानला शांतता, सुरक्षा आणि सामाजिक आणि आर्थिक प्रगती हवी आहे. टीका करताना जयशंकर यांनी दहशतवादाशी व्यापार होऊ शकत नाही, अशा शब्दात पाकिस्तानची कानउघडणी केली.

पाकिस्तानला इशारा देत परराष्ट्र मंत्री (S. Jaishankar) म्हणाले की, जर परस्पर विश्वास कमी होत असेल किंवा पुरेसे सहकार्य नसेल… जर मैत्रीत फूट पडत असेल आणि नैतिक शेजाऱ्यांचा अभाव जाणवत असेल तर त्यामागील कारणांचे विश्लेषण केले पाहिजे. पाकिस्तान-चीन सीपीईसी प्रकल्पामुळे भारतीय सार्वभौमत्वाचे उल्लंघन होत असल्याचा मुद्दाही त्यांनी उपस्थित केला.

पुढे ते म्हणाले, एससीओचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी दहशतवाद, फुटीरतावाद आणि दहशतवाद यांच्याशी लढा देणे आवश्यक आहे. यासाठी एकमेकांवर विश्वास आणि प्रामाणिकपणा आवश्यक आहे. “यासाठी प्रामाणिक संवाद, विश्वास, चांगला शेजारीृ आणि SCO चार्टरची बांधिलकी आवश्यक आहे,”, असेही (S. Jaishankar) ते म्हणाले.

हेही पाहा :

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.