- प्रतिनिधी
भारतीय जनता पक्षाने (BJP) अध्यक्ष निवडीसाठी समिती स्थापन केली आहे. मंगळवारी स्थापन करण्यात आलेल्या या समितीमध्ये डॉ. के. लक्ष्मण (भाजपा ओबीसी मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि पक्षाचे खासदार) यांची राष्ट्रीय निवडणूक अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे, तर नरेश बन्सल, रेखा वर्मा आणि संबित पात्रा यांना सहनिवडणूक अधिकारी नियुक्त केले गेले आहे. ही समिती पक्ष संघटनेच्या निवडणुका घेणार आहे. त्यानंतर पुढे पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षाची निवड होणार असून ही प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी सुमारे दोन महिन्यांचा कालावधी लागणार आहे. राज्य परिषदेचे सदस्य राज्यांच्या अध्यक्षांची निवड करतील. नंतर राष्ट्रीय परिषदेचे लोक राष्ट्रीय अध्यक्षाची निवड करतील.
सध्या जेपी नड्डा भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. त्यांचा कार्यकाळ संपला होता, जो नंतर जून २०२४ पर्यंत वाढवण्यात आला. भाजपाच्या (BJP) संसदीय मंडळाने त्यांना पुढील अध्यक्षाची नियुक्ती होईपर्यंत या पदावर राहण्यासाठी मुदतवाढ दिली आहे. भाजप नवीन प्रमुखाच्या शोधात आहे. यावर्षी डिसेंबरपर्यंत भाजपाला पुढचे अध्यक्ष मिळू शकतात, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे. भाजपाच्या सूत्रांच्या म्हणण्यानुसार, पक्षाच्या प्रदेशाध्यक्षांच्या निवडणुका १ डिसेंबरपासून सुरू होणार आहेत. अशा ५०% निवडणुकांनंतर राष्ट्रीय अध्यक्ष निवडीची अधिकृत प्रक्रिया सुरू केली जाईल. ही समिती प्रथम राज्यांमध्ये संघटनात्मक निवडणुका घेईल. उदाहरणार्थ, आधी मंडल, जिल्हा आणि नंतर प्रदेशाध्यक्षांची निवडणूक होईल.
(हेही वाचा – Medicine Price Hike : सर्वसामान्यांना मोठा फटका! औषधांच्या किंमती ५० टक्क्यांनी महागण्याची शक्यता)
त्यानंतर राष्ट्रीय अध्यक्ष निवडीची प्रक्रिया सुरू होणार आहे. बूथ, विभाग, जिल्हा आणि राज्यस्तरावरील अध्यक्षांच्या निवडीच्या तारखा अनुक्रमे जाहीर केल्या जातील. त्यानंतर जिल्हाध्यक्ष आणि प्रदेश परिषदेच्या निवडणुका होतील. राज्य परिषदेनंतर प्रदेशाध्यक्ष आणि राष्ट्रीय परिषद सदस्यांसाठी निवडणूक होणार आहे. राज्य परिषदेचे सदस्य राज्यांच्या अध्यक्षांची निवड करतील. नंतर राष्ट्रीय परिषदेचे लोक राष्ट्रीय अध्यक्षाची निवड करतील. राष्ट्रीय अध्यक्षांच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर उमेदवारी अर्ज आणि मतदानाची तारीख जाहीर करण्यात येणार आहे. राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी एकच नाव आल्यास निवडणूक अधिकारी त्यांना पक्षाचा नवा राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून घोषित करतात.
खरं तर जेपी नड्डा यांचा कार्यकाळ जूनमध्ये वाढवण्यात आला होता. नड्डा यांचा कार्यकाळ या वर्षी जानेवारीत संपला. लोकसभा निवडणुकीसाठी जूनपर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. जुलैमध्ये पक्ष नवीन अध्यक्ष निवडणार होता, परंतु नवीन अध्यक्ष निवडण्यापूर्वी संघटनात्मक निवडणुका आवश्यक आहेत. यास ६ महिने लागतात. त्यामुळे जूनमध्ये नड्डा यांचा कार्यकाळ आणखी ६ महिन्यांनी वाढवण्यात आला.
(हेही वाचा – Election Commission : मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांच्या हेलिकॉप्टरचे इर्मजन्सी लँडिंग)
कार्यवाह अध्यक्ष निवडला जाऊ शकतो
नड्डा हे केंद्रीय मंत्री देखील आहेत, त्यामुळे कोणत्याही सरचिटणीसाला त्यांचे दैनंदिन कामकाज चालवण्यासाठी कार्यवाह अध्यक्ष बनवले जाऊ शकते. सुनील बन्सल आणि विनोद तावडे यांची नावे आघाडीवर आहेत. नंतर पूर्ण अध्यक्षपदाची जबाबदारी कार्यकारिणीकडे सोपवली जाऊ शकते. ज्याला कार्यवाह अध्यक्षपदाची जबाबदारी मिळेल त्याला भविष्यात पूर्णवेळ अध्यक्ष बनवले जाऊ शकते, असे सूत्रांचे म्हणणे आहे. पक्षाध्यक्षाचा कार्यकाळ ३ वर्षांचा असल्याने. त्यामुळे ऑक्टोबर-नोव्हेंबर २०२५ च्या बिहार विधानसभा निवडणुका, २०२६ च्या पश्चिम बंगाल आणि २०२७ च्या उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकांसाठी नवीन अध्यक्ष पुरेशा वेळेत आपली नवीन टीम तयार करू शकतात. त्याच वेळी, २०२८ मध्ये नवीन राष्ट्रपती निवडण्याची वेळ आल्यावर, २०२९ च्या लोकसभा निवडणुकीच्या तयारीसाठी त्यांना सुमारे दीड वर्षांचा कालावधी मिळेल. (BJP)
कार्यवाह अध्यक्ष करण्यामागचे कारण
भाजपाच्या (BJP) घटनेत ‘एक व्यक्ती, एक पद’ अशी व्यवस्था आहे त्यामुळे नड्डा केंद्रीय मंत्री असताना पूर्णवेळ राष्ट्रीय अध्यक्ष राहू शकत नाहीत. त्यामुळे कार्याध्यक्ष नेमून ही तांत्रिक बाजू पक्ष सोडवू शकतो. २०१९ नंतरही भाजपाने अमित शहा यांना अध्यक्षपदी ठेवले. नड्डा कार्याध्यक्ष झाले.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community