मोदी सरकारने (modi government) कॅबिनेट मिटिंगमध्ये शेतकऱ्यांसाठी मोठ्या दिवाळी गिफ्टची घोषणा केली आहे. केंद्र सरकारने रब्बी हंगामातील पिकांसाठी किमान आधारभूत किमंत (एमएसपी) मध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये गहू पिकाला प्रति क्विंटल १५० रुपये तर मोहिराला ३०० रुपये प्रति क्विंटल एमएसपी दिली जाणार आहे. (MSP Hike)
( हेही वाचा : प्रेयसीच्या भेटीसाठी Gangster Abu Salem आतूर, तुरुंगातून बाहेर पडण्यासाठी टाडा न्यायालयाकडे केला अर्ज)
एमएसपी म्हणजे काय?
एमएसपी (MSP Hike) म्हणजे किमान आधारभूत किंमत, ही किंमत सरकार शेतकऱ्यांच्या धान्यासाठी निश्चित करत असते. अर्थात सरकार ज्या किंमतीमध्ये शेतकऱ्यांकडून त्यांचे धान्य विकत घेते त्याला एमएसपी असे म्हणतात. याचा उद्देश असतो की, धान्याची किंमत कमी किंवा जास्त झाली तर शेतकऱ्याचे किमान आधारभूत किंमतीमुळे नुकसान होणार नाही. (MSP Hike)
दरम्यान २०२५ -२६ या आर्थिक वर्षासाठी केंद्र सरकारने रब्बी पिकांसाठी एमएसपी (MSP Hike) निश्चित केला आहे. यामध्ये गव्हासाठी एमएसपी १५० रुपये प्रति क्विंटलने वाढवून २ हजार ४२५ रुपये करण्यात आली आहे. मोहरी पिकाची एमएसपी ३०० रुपये प्रति क्विंटल वाढवून ती ५ हजार ६५० करण्यात आली आहे. त्याचबरोबर हरभऱ्याचे २१० रुपये, मसूरचे २७५ रुपये, करडईचे १४० रुपये वाढवून प्रति क्विंटलप्रमाणे एमएसपी निश्चित करण्यात आली आहे. (MSP Hike)
हेही पाहा :
Join Our WhatsApp Community