मुंबई येथून अयोध्येला जाणारे स्पाइस जेट (SpiceJet) कंपनीची फ्लाईट कोणतेही पूर्वकल्पना न देता उशीर केल्याने प्रवाशांना मनस्ताप झाला. विशेष म्हणजे तब्बल दोन तास प्रवासी विमानाच्या प्रतीक्षेत असूनही कंपनीकडून निश्चित माहिती दिली जात नसल्यामुळे अखेर प्रवाशांनी विमानतळावरच गोंधळ घालायला सुरुवात केली.
View this post on Instagram
मुंबई ते अयोध्या SpiceJet flight SG 325 हे विमान मुंबई विमानतळ टर्मिनल 1 येथून 16 ऑक्टोबरला दुपारी 2.45 ला सुटणार होते. स्पाइस सेट कडून हे विमान 2.30 सुटेल असे मेसेज सर्वांना पाठवण्यात आले. सर्व प्रवासी विमानतळावर आल्यावर 2.10 वाजून गेल्यानंतरही बोर्डिंगसाठी स्पाइस जेट (SpiceJet) कर्मचाऱ्यांकडून कोणतेही हालचाल दिसून येत नव्हती. त्यामुळे प्रवाशांनी कंपनीच्या कर्मचाऱ्यांना याविषयी विचारायला सुरुवात केली. तेव्हा त्यांनी विमानाला उशीर होईल, असे सांगितले. विमान साडेचार किंवा पाच वाजल्यानंतर सुटेल किंवा एखाद वेळेस त्याहीपेक्षा उशिरा सुटेल. कुणाला रिफंड हवा असेल तर ते घेऊ शकतील, असे त्यांनी सांगितले. विमानात काहीतरी टेक्निकल अडचण आल्यामुळे सध्याची वेळ साडेपाच आहे असे नंतर सांगण्यात आले. प्रवाशांनी यावर तुम्ही अधिकृत अनाउन्समेंट करा असे सांगितले.
(हेही वाचा लाडकी बहीण योजनेमुळे Mahayuti सुसाट; महाआघाडी मात्र संभ्रमात)
कर्मचाऱ्यांकडून मोघम उत्तरे
मात्र त्यांनी कोणतीही अनाउन्समेंट केली नाही, तर चौकशीला येणाऱ्या प्रवाशांना ते सांगत होते. त्यामुळे प्रवाशांनी त्यांना जाब विचारल्यावर त्यांनी शक्यतो साडेपाच सहापर्यंत वाजेपर्यंत होईल असे वाटते, असे मोघम उत्तर दिले, त्याहीपेक्षा उशीर झाल्यास आम्ही रात्रीच्या राहण्याची व्यवस्था करू, असेही सांगितले. त्या विमानात बिघाड आहे तर पर्यायी विमानाची व्यवस्था करा असे प्रवाशांनी त्यांना सांगितल्यानंतर त्यांनी आमच्याकडे दुसरे विमान येथे उपलब्ध नाही. अन्य ठिकाणाहून तुम्ही मागवू शकता का, असे विचारल्यावर त्यांनी ‘नाही असे सांगितले. मुंबईसारख्या मोठ्या विमानतळावर स्पाइस जेटची अन्य पर्यायी व्यवस्था कोणतीही दिसून न आल्याने प्रवाशांनी आश्चर्य व्यक्त केले. तसेच सायंकाळी ४ वाजेपर्यंत स्पाइस जेट (SpiceJet) कडून कोणतीही माहिती प्रवाशांना देण्यात आली नाही.
Join Our WhatsApp Community