Transgender Voters : पाच वर्षांत तृतीयपंथी मतदारांच्या संख्येत दुपटीने वाढ!

98
Polling बूथपर्यंत मोबाइल नेण्याची परवानगी बाबत Election Officer सकारात्मक
  • खास प्रतिनिधी 

गेल्या पाच वर्षांत राज्यात तृतीयपंथी मतदारांची संख्या दुपटीने वाढल्याचे राज्य निवडणूक आयोगाने दिलेल्या आकडेवारीत स्पष्ट झाले आहे.

तृतीयपंथी मतदारांची संख्या २,५९३ वरून ६,०३१

राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोकलिंगम यांनी राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारांची आकडेवारी दिली. त्यात २०१९ च्या तुलनेत तृतीयपंथी मतदारांची संख्या दुपटीने वाढली असल्याचे दिसून आले. २०१९ मध्ये २,५९३ असलेल्या तृतीयपंथी मतदारांची संख्या ६,०३१ वर गेली आहे. (Transgender Voters)

(हेही वाचा – SpiceJet चा गलथान कारभार; मुंबईहून आयोध्येकडे जाणाऱ्या प्रवाशांची विमानाअभावी विमानतळावर तासनतास रखडपट्टी )

वंचित घटकांपर्यंत पोहोचण्यासाठी विशेष प्रयत्न

याबाबत विचारले असता चोकलिंगम म्हणाले की, यावेळी निवडणूक कार्यालयाने विशेष मोहीम राबवून तृतीयपंथी मतदारांची नोंदणी केली आहे, त्यामुळे ही आकडेवारी वाढल्याचे दिसून येते. “वंचित घटकांपर्यंत पोहोचणे आणि त्यांच्या मतदार नोंदणीसाठी निवडणूक आयोगाने विशेष प्रयत्न केले. यात तृतीयपंथी, वेश्याव्यवसाय करणाऱ्या महिला आणि समलैंगिक अशा तीन घटकांचा प्रामुख्याने समावेश आहे,” असे चोकलिंगम यांनी सांगितले.

शंभरी पार ४७,७१६ मतदार

दरम्यान, अद्यावत मतदार यादीमध्ये ८५ वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांची संख्या १२.४३ लाख आहे. यापैकी इच्छुक मतदारांना टपाली मतपत्रिकेद्वारे गृह मतदानाची सुविधा उपलब्ध होऊ शकेल. मतदार यादीतील ८५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांपैकी ४७,७१६ इतके मतदार १०० वर्षावरील आहेत, अशी माहिती निवडणूक अधिकारी चोकलिंगम यांनी दिली. (Transgender Voters)

(हेही वाचा – MSP Hike : मोदी सरकारचे दिवाळीआधी शेतकऱ्यांना मोठे गिफ्ट)

दिव्यांग मतदारांना ‘गृह-मतदान’ सुविधा

याशिवाय दिव्यांग मतदार ६.३६ लाख, सेनादलातील मतदार १.१६ लाख आणि १८-१९ वयोगटातील मतदारांची संख्या जवळपास २१ लाख इतकी असल्याचे त्यांनी सांगितले. दिव्यांग मंतदारांपैकी, ४० टक्के पेक्षा अधिक अपंगत्व आहे, अशा दिव्यांग मतदारांना ‘गृह-मतदान’ सुविधा म्हणजेच त्यांचे मतदान घेण्यासाठी निवडणूक कर्मचारी त्यांच्या घरी भेट देतील, अशी सुविधा उपलब्ध असेल तर ज्येष्ठ नागरिकांना स्वयं-घोषणा पत्र देऊन या सुविधेचा लाभ घेता येऊ शकेल, असे चोकलिंगम म्हणाले. (Transgender Voters)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.