Congress ने लोकसभा निवडणुकीत लाच म्हणून वापरला सरकारी निधी; ईडीच्या चार्जशीटमध्ये खुलासा

147
Congress ने लोकसभा निवडणुकीत लाच म्हणून वापरला सरकारी निधी; ईडीच्या चार्जशीटमध्ये खुलासा
Congress ने लोकसभा निवडणुकीत लाच म्हणून वापरला सरकारी निधी; ईडीच्या चार्जशीटमध्ये खुलासा

कर्नाटकमध्ये वाल्मिकी घोटाळ्याचे पैसे काँग्रेसने (Congress) निवडणूकीत जिंकण्यासाठी वापरल्याची माहिती उघडकीस आली आहे. कर्नाटक काँग्रेस (Congress) सरकारमधील मंत्री बी. नागेंद्र यांनी सरकारी फंडातील पैसे बेल्लारी लोकसभा मतदारसंघात लाच म्हणून वाटल्याचा खुलासा ईडी चार्टशीटमध्ये करण्यात आला आहे.

(हेही वाचा : SpiceJet चा गलथान कारभार; मुंबईहून आयोध्येकडे जाणाऱ्या प्रवाशांची विमानाअभावी विमानतळावर तासनतास रखडपट्टी )

ईडीने याप्रकरणी दाखल केलेल्या चार्टशीटमध्ये सांगितले की, बेल्लारी लोकसभा मतदारसंघात जवळजवळ ७ लाख मतदारांना फंडातील पैसे लाच म्हणून देण्यात आले. ही लाच त्यांनी काँग्रेसला (Congress) मतदान करण्यासाठी दिले होते. हे पैसे नागेंद्र यांनी महर्षी वाल्मिकी जनजातीय विकास निगममध्ये घोटाळा करत मिळवले.

बेल्लारीमध्ये १४ कोटींची लाच

ईडीने सांगितले की, बेल्लारीमध्ये ७ लाख मतदारांना प्रत्येकी २०० रुपयांची लाच देण्यात आली. ईडीने सांगितले, निवडणूक प्रभावीत करण्यासाठी हे पैसे वाटप करण्यात आले. ईडीने बी. नागेंद्र, के पूर्वचे सचिव विजय गौंडा याचे फोनची तपासणी केली. त्यात फोनमध्ये बेल्लारीमध्ये खर्च झालेल्या पैशांचा तपशील मिळाला. विजय गौंडाने पण यासंबधात माहिती दिली.

ईडीने आरोप केला आहे की, बी. नागेंद्र याच्याकडे या घोटाळ्यातील सर्वाधिक पैसे आले होते. ईडीला विजय गौंडा यांनी सांगितले की, त्याने घोटाळ्याचे पैसे नागेंद्रच्या सांगण्यावरून अनेक लोकांमध्ये वाटले. जे काँग्रेसशी (Congress) संबंधित होते. हे घोटाळ्याचे पैसे काँग्रेस उमेदवार ई तुकाराम यांच्यासाठी वापरण्यात आले. तसेच ईडीने आरोप केलाय की, मतदान केंद्रानुसार काँग्रेस (Congress) कार्यकर्त्यांना १० हजार रुपये देण्यात आले होते. ईडीजवळ देवाणघेवाणीचे फोटोही असल्याचे सांगितले आहे.

हेही पाहा :

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.