Assembly Elections 2024 : विधानसभा निवडणुकीतही मतदान केंद्रात मोबाईल फोनसह प्रवेशबंदी!

268
Assembly Elections 2024 : विधानसभा निवडणुकीतही मतदान केंद्रात मोबाईल फोनसह प्रवेशबंदी!
  • विशेष प्रतिनिधी, मुंबई

लोकसभा निवडणुकीत मोबाईल फोनमुळे अनेक मतदारांना माघारी परतावे लागले तसेच काहींना मतदानापासून वंचित राहावे, यामुळे मतदारांमध्ये प्रचंड नाराजी पसरली होती. परंतु भारत निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक तत्वांमध्ये हा नियम कायम ठेवण्यात आल्याने आगामी विधानसभा निवडणुकीतही (Assembly Elections 2024) मतदान केंद्रावर आपल्याला मोबाईल फोन नेता येणार नाही. मतदारांना मोबाईल फोनसह मतदान केंद्रावर प्रवेश बंदी असून आपला मोबाईल फोन घरी ठेवावा किंवा सहकाऱ्यांकडे ठेवूनच मतदानाचा हक्क बजावावा लागणार आहे.

भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ (Assembly Elections 2024) कार्यक्रम जाहीर केल्यानंतर मुंबईतील ३६ विधानसभा क्षेत्राबाबत दोन्ही उपनगरांमधील निवडणुकीची जबाबदारी सोपवलेल्या महापालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. भूषण गगराणी यांनी पत्रकार परिषद घेऊन मुंबईतील मतदानाची माहिती दिली.

(हेही वाचा – Transgender Voters : पाच वर्षांत तृतीयपंथी मतदारांच्या संख्येत दुपटीने वाढ!)

मुंबई उपनगरांमध्ये एकूण ७५७४ मतदान केंद्र आहेत, तर शहरांमध्ये २५३७ मतदान केंद्र आह. उपनगरांमध्ये एकूण ७६ लाख ४७ हजार ९६७ मतदार असून त्यामध्ये महिला मतदारांची संख्या ३५ लाख ६१ हजार ५८७ तर पुरुष मतदारांची संख्या ४० लाख ८५ हजार ५५० मतदारांचा समावेश आहे. सहकारी गृहनिर्माण संस्थांमध्ये ५५३ मतदान केंद्र आहेत, तर झोपडपट्टी परिसरांमध्ये २२९ मतदान केंद्र आहे, शिवाय मंडप उभारलेले १३०२ मतदान केंद्र आहेत.

तर शहर भागांमध्ये एकूण २५ लाख ३४ हजार २७६ मतदार असून त्यामध्ये ११ लाख ७१ हजार ८०८महिला तर १३ लाख ६२ हजार २२४ पुरुष मतदारांचा समावेश आहे. शहरामध्ये उत्तुंग इमारतींध्ये १५६ मतदान केंद्र असून सहकारी गृहनिर्माण संस्थांमध्ये १०० मतदान केंद्र आहेत, तर झोपडपट्टी परिसरांमध्ये ३१३ मतदान केंद्र आहे, शिवाय मंडप उभारलेले ७५ मतदान केंद्र असल्याची माहिती डॉ. भूषण गगराणी यांनी दिली. मतदानाच्या दिवशी मतदान केंद्रावर मूलभूत सेवा पुरवण्यावर भर दिला जाणार आहे. मतदान केंद्रावर स्वच्छतागृह, पिण्याची पाण्याची व्यवस्था, आसन व्यवस्था यासह अपंग आणि ज्येष्ठ नागरिकांसाठीची व्यवस्था करण्यात येणार आहे. (Assembly Elections 2024)

(हेही वाचा – Alex Ferguson : ॲलेक्स फर्ग्युसन सोडणार मॅन्चेस्टर युनायटेडची साथ?)

मतदार नोंदणी १९ ऑक्टोबरपर्यंत रात्रीपर्यंत

मतदार नोंदणीसाठी अर्ज करयासाठी शेवटच्या दहा दिवसांपूर्वी मतदार नोंदणी करता येणार आहे. म्हणजे १९ ऑक्टोबर २०२४ रोजी रात्री बारावाजेपर्यंत मतदार नोंदणीचे अर्ज स्वीकारला येतील. संबंधित मतदार नोंदणी अधिकारी विधानसभा निवडणूक कार्यालयात मतदार नोंदणीबाबतचे अर्ज उपलब्ध आहे, त्या कार्यालयात अर्ज भरून जमा करावयाचे आहे. तसेच ऑनलाईन नोंदणीसाठी https://voters.eci.gov.in/ या संकेतस्थळावर भेट देवून करता येईल तसेच यासाठी १९५०ही हेल्पलाईनही उपलब्ध आहे. एवढेच नाही तर Voter helpline app वर आपले नाव मतदार यादीत तपासता येईल नवीन मतदार नोंदणी या ऍपद्वारे करता येईल. (Assembly Elections 2024)

मुंबईमध्ये १२०० पेक्षा अधिक मतदार असलेल्या मतदान केंद्राची ख्या ही १२७६ एवढी असून १० हजार पेक्षा अधिक मतदार असलेल्या १३९ मतदान केंद्रांची ठिकाणे आहेत. तसेच संवेदनशील मतदान केंद्राची मॅपिंगही सध्या पोलिस आणि जिल्हाधिकारी कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून केले जात आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.