बेस्टमध्ये खासगी बसेसची सेवा घेण्याचा आमचा प्रयत्न फसला; UBT Shiv Sena च्या सुहास सामंतांनी केले मान्य

2315
बेस्टमध्ये खासगी बसेसची सेवा घेण्याचा आमचा प्रयत्न फसला; UBT Shiv Sena च्या सुहास सामंतांनी केले मान्य
  • विशेष प्रतिनिधी, मुंबई

बेस्टमध्ये भाडेकरारावर घेण्यात आलेल्या खासगी बसेसच आता बंद होत चालल्या असून या कंपन्या आता काम करायला तयार नाहीत. दुसरीकडे बेस्ट उपक्रमाचा ३३३७ चा स्वत:चा ताफा कमी होत आहे. याचा परिणाम बेस्टच्या परिवहन सेवेवर होत असून ही सेवा केव्हाही बंद होऊ शकते अशी भीती मागील २५ वर्षांपासून बेस्टवर सत्ता असलेल्या उबाठा शिवसेनेच्या (UBT Shiv Sena) बेस्ट कामगार सेनेने व्यक्त केली. भाडेकरारावर खासगी बसेस घेण्याचा आमचा प्रयोग फसला असे सांगत त्यांनी आपली चूक मान्य केली. पाच रुपयांचे तिकीट केल्याने अधिक महसूल घटला असल्याचे सांगत कामगार सेनेचे अध्यक्ष सुहास सामंत यांनी समुद्रातील कोस्टल रोड बांधण्याऐवजी बेस्टच्या परिवहन सेवांमध्ये अधिक सुधारणा करायला हवी होती असे सांगत एकप्रकारे आपल्याच पक्षावर आणि उद्धव ठाकरेंचे ड्रिम प्रोजेक्ट मानल्या जाणाऱ्या कोस्टल रोडवरही टिका केली.

बेस्टच्या आर्थिक परिस्थितीबाबत बेस्ट कामगार सेनेचे अध्यक्ष सुहास सामंत यांनी मुंबई मराठी पत्रकार परिषदेत बोलतांना, ज्यांना राज्यात सत्तेवर यायचे आहे, त्यांनी आधी सर्वसामान्यांचा विश्वास असलेल्या बेस्टला वाचवावे असे साकडे घातले आहे. बेस्टमधून आज ४५ लाख प्रवाशी प्रवास करत असल्याचा दावा करत सामंत यांनी विद्युत विभागाचे ११ लाख ग्राहक आणि ३० हजार कामगार, कर्मचारी वर्ग आहेत. त्यामुळे बेस्ट उपक्रम पुढील दोन वर्षांत बंद होईल अशी भीती त्यांनी व्यक्त करून हे टाळण्यासाठी युद्ध पातळीवर उपाययोजना करण्याची गरज असल्याचे आवाहन केले आहे. (UBT Shiv Sena)

(हेही वाचा – Vote Jihad शब्दाने आचारसंहितेचा भंग होतो का? निवडणूक अधिकारी म्हणाले, पुरावे तपासावे लागतील… )

बेस्ट उपक्रमांत खासगी कंत्राटदारांच्या बस वाहतुकीस परवानगी मिळाल्यानंतर खासगी ठेकेदार कंपनीकडून बस सेवा सुरु करण्यात आल्या. सध्या बेस्ट उपक्रमाच्या स्वमालकीच्या १०४७ एवढा बस ताफा असून या एकूण उपलब्ध बसगाड्यांपैंकी ५४७ बसेसचे आयुर्मान डिसेंबर २०२४ संपत आहे. त्यामुळे त्या भंगारा निघणार असल्याने जेमतेम ५०० बसेस एवढीचा स्वमालकीचा बस ताफा राहणार आहे. तर खासगी मालकीच्या आतापर्यंत एम पी ग्रुप, हंसा मोटर्स प्रायव्हेट लिमिटेड या दोन कंपन्यांनी आतापर्यंत ६९७ बसेस बंद केल्या आहेत. या बसेस वाहतुकीसाठी बंद आहेत. तसेच भविष्यातही ते सेवा सुरु ठेवण्यास तयार नाहीत. त्यामुळे खासगी बस सेवा बंद झाल्यास बेस्टचा स्वलमाकीचा ताफा नसल्याने तसेच कर्मचारी नसल्याने बेस्टची बस सेवा कोलडून जाणार आहे अशी भीती त्यांनी व्यक्त केली. य खासगी बस सेवांचे कंत्राट शिवसेनेची बेस्ट समितीमध्ये तसेच महापालिकेल सत्ता असताना मंजूर करण्यात आले होते. मात्र, आमचा हा प्रयोग फसला असे सांगत एकप्रकारे या खासगी सेवा घेण्याची आमची चूक झाल्याचे सामंत यांनी मान्य केले. (UBT Shiv Sena)

सध्याची बेस्टची आर्थिक स्थिती पाहता महापालिकेने बेस्टला आर्थिक मदत करावी अशी मागणी केली. बेस्ट बसची तिकीट पाच ते सहा रुपये करण्याचा निर्णय तत्कालिन शिवसेनेने घेतला असून एवढा तिकीट दर सरकारने कमी केल्याचा आरोप त्यांनी केला. तसेच बेस्टला आर्थिक मदत करून सक्षम करणे आवश्यक असताना कोस्टल रोडसारखा प्रकल्प बांधण्याची काय गरज होती असाही सवाल सामंत यांनी केला. त्यामुळे खासगी बसेस भाडेकरारावर घेणे, तिकीट दर कमी करणे हे निर्णय तत्कालिन सत्ताधारी शिवसेनेने घेतले असतानाही सामंत यांनी याचे खापर सरकारवर फोडण्याचा प्रयत्न करत सरकारने आधी गरीबांची बेस्ट वाचवण्यासाठी निधी उपलब्ध करून द्यावा अन्यथा आपण जनआंदोलन करू असाही इशारा सामंत यांनी दिला. (UBT Shiv Sena)

(हेही वाचा – विधानसभेनंतर मनसे पक्ष सत्तेत असेल; Raj Thackeray यांचा पुनरुच्चार)

बेस्टचा संचित तोटा हा १२ हजार ९९३ कोटी होता, तो आगामी वर्षांत ९५०० कोटी दर्शवला गेला आहे. तर बेस्टच्या निवृत्त कर्मचाऱ्यांचे उपदान अर्थात ग्रॅज्युएटी पोटी ५५५० कोटी रुपयांचे देणे असून खासगी कंपन्यांचे कंत्राटी कामगारांना बेस्टच्या सेवेत घेण्याची मागणी त्यांनी केली, तसेच अनुकंपा तत्वावरील प्रतीक्षा यादीवरील कामगारांच्या नातेवाईकांना सेवेत घेण्याचीही मागणी त्यांनी केली. आतापर्यंत सरकार तसेच महापालिकेने दिलेल्या निधीपैंकी ७० टक्के निधी हा खासगी बस कंपन्यांना दिल्याचाही आरोप त्यांनी केला. (UBT Shiv Sena)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.